Pune Airport : मुंबईला जाण्याची कटकट संपली; पुणे विमानतळावरुन आता 'या' दोन देशामध्ये करता येणार प्रवास

Last Updated:

Pune To Dubai Daily Flights : पुणे विमानतळावरून आता थेट बँकॉक आणि दुबईला उड्डाणे सुरू होणार आहेत. 2025 च्या हिवाळी वेळापत्रकात एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाइसजेट या विमान कंपन्या या उड्डाणांची सुविधा देणार आहेत.

News18
News18
पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे विमानतळाने 2025 या वर्षासाठी हिवाळी वेळापत्रक जाहीर केले असून आता पुण्यातून थेट बँकॉक आणि दुबईला प्रवास करता येणार आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह देशातील तब्बल 34 शहरांशी पुणे विमानतळ जोडले जाणार आहे. त्यामुळे पश्चिम भारतातील एक महत्त्वाचे विमान केंद्र म्हणून पुण्याची ओळख आणखी मजबूत होणार आहे.
आठवड्यातून किती दिवस होतील उड्डाणे?
या वेळापत्रकानुसार पुण्यातून बँकॉकसाठी एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो या विमान कंपन्यांच्या उड्डाणांची सुविधा उपलब्ध असेल. एअर इंडिया एक्सप्रेसचे बँकॉकसाठी रोजचे उड्डाण असेल तर इंडिगोची उड्डाणे आठवड्यातून तीन दिवस म्हणजे बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी चालतील. दुबईसाठी स्पाइसजेट आणि इंडिगो या दोन्ही विमान कंपन्या दररोज उड्डाणे चालवतील. त्यामुळे परदेश प्रवास करणाऱ्या पुणेकरांना आता थेट आणि अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
advertisement
पुणे विमानतळ आता थेट 34 शहरांशी जोडले जाणार!
देशांतर्गत उड्डाणांच्या बाबतीत पुणे विमानतळावरून प्रवाशांना देशातील 34 शहरांमध्ये थेट जाता येईल. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगलुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, गोवा, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, इंदूर, नागपूर, वडोदरा, अमृतसर, भोपाळ, भुवनेश्वर, रांची, गुवाहाटी, कोची, कोयंबतूर, डेहराडून, राजकोट, हुबळी, जळगाव, किशनगड, सुरत, सिंधुदुर्ग, वाराणसी, तिरुवनंतपुरम आणि मोपा या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
advertisement
नव्या वेळापत्रकानुसार एकूण 208 उड्डाणे दररोज पुणे विमानतळावरून सुरू राहतील. या उड्डाणांमध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या उड्डाणांचा समावेश आहे. पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अत्यंत सोयीची बाब ठरणार आहे, कारण आता अधिक शहरांशी थेट संपर्क साधता येणार आहे.
पुणे विमानतळावर वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता नवीन वेळापत्रकामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल अशी अपेक्षा आहे. हिवाळ्याच्या हंगामात प्रवास करणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे. बँकॉक आणि दुबईसारख्या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांपर्यंत थेट विमानसेवा उपलब्ध झाल्याने पर्यटन आणि व्यावसायिक प्रवास दोन्हींसाठी पुण्याचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Airport : मुंबईला जाण्याची कटकट संपली; पुणे विमानतळावरुन आता 'या' दोन देशामध्ये करता येणार प्रवास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement