Special Train: इंडिगो संकटादरम्यान पुण्यातील प्रवाशांना रेल्वेकडून दिलासा; आज या 3 शहरांसाठी विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुणे रेल्वे विभागाने विमानतळावर विशेष 'रेल्वे मदत कक्ष' कार्यान्वित केला आहे.
पुणे : इंडिगो एअरलाईन्सच्या कोलमडलेल्या विमानसेवेमुळे पुण्यात प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. विमाने रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होत असून, याचा गैरफायदा घेत इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुणे रेल्वे विभागाने विमानतळावर विशेष 'रेल्वे मदत कक्ष' कार्यान्वित केला आहे.
या मदत कक्षात रेल्वेचे दोन अधिकारी २४ तास तैनात आहेत. ज्यांची विमाने रद्द झाली आहेत अशा प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक आणि आरक्षणाबाबत तत्काळ माहिती दिली जात आहे. तसेच, वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे विभागाने बेंगळुरू, हैदराबाद आणि हिसार या शहरांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत.
advertisement
विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:
१. पुणे-बेंगळुरू स्पेशल (०६२६४): ही गाडी ८ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता सुटेल आणि सोलापूर, वाडी, गुंटकलमार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता बेंगळुरू पोहोचेल.
२. हडपसर-हैदराबाद स्पेशल (०७१६८): ही गाडी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता सुटून छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि सिकंदराबादमार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी ४:४५ वाजता हैदराबादला पोहोचेल.
advertisement
३. खडकी-हिसार स्पेशल (०४७२६): ही गाडी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०:२५ वाजता हिसारला पोहोचेल.
विमानतळ परिसरातील हॉटेल्सनी देखील दरात वाढ केल्याने प्रवासी अडचणीत सापडले आहेत. अशा वेळी रेल्वेच्या या तत्पर निर्णयामुळे प्रवाशांना केवळ आर्थिक दिलासाच मिळाला नाही, तर त्यांच्या प्रवासाचा खोळंबाही टळला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Special Train: इंडिगो संकटादरम्यान पुण्यातील प्रवाशांना रेल्वेकडून दिलासा; आज या 3 शहरांसाठी विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक


