पुण्यातील बाजीराव रोडवर रक्ताचा सडा! मित्रांनी केलेली चूक मयंकच्या जिवावर बेतली, हल्ल्याच्या 48 तास आधी काय झालं होतं?

Last Updated:

Pune Bajirao Road Mayank Kharade Murder : पुण्यातील जनता वसाहत परिसरात गेल्या दोन वर्षांपासून गुंडगिरी वाढली असून तेथील टोळीयुद्धात गेल्या दोन वर्षांत तीन जणांचा बळी गेला.

Pune Bajirao Road Mayank Kharade Murder
Pune Bajirao Road Mayank Kharade Murder
Pune Crime News : पुण्यातील बाजीराव रोडवर धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी भर दुपारी तीन वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबाग परिसरात एका मयंकचा कोयत्याचे वार करून निघृण खून करण्यात आला. यासदंर्भात तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहराच्या मध्यवस्तीत ऐन रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी वेगवान तपास करत तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

साने गुरुजी वसाहतीत खोली मिळाली पण...

मयंक हा मूळचा जनता वसाहत परिसरातील रहिवासी आहे. त्याची आई पुणे महापालिकेत नोकरीला असून त्यांना काही महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेच्या साने गुरुजी वसाहतीत खोली मिळाली होती. त्यामुळे हे कुटुंब या वसाहतीत वास्तव्याला आले. मात्र, मयंकचा वावर जनता वसाहतीतच अधिक होता. मयंकची मित्र कंपनी जनता वसाहत इथंच असल्याने तो तिथं सारखा जात असायचा.
advertisement

मयंकच्या मित्रांची एकाला मारहाण

जनता वसाहत परिसरात गेल्या दोन वर्षांपासून गुंडगिरी वाढली असून तेथील टोळीयुद्धात गेल्या दोन वर्षांत तीन जणांचा बळी गेला. तसेच दहाहून अधिक जण जायबंदी झाले आहेत. तेथील काही गुंडांशी मयंक याची भांडणं झाली होती. त्यातून दोन दिवसांपूर्वी मयंकच्या मित्रांनी एकाला मारहाण केली होती. त्यामुळे तेथील काही जण त्याच्या मागावर होते, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement

दुपारी सव्वा तीनच्या सुमारास काय घडलं?

दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयंकच्या हत्येमागे नव्याने उदयास आलेल्या 'माया टोळी'चे कृत्य असल्याचा संशय आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यात मयंक या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ, दखनी मिसळसमोर ही घटना घडली. या खून प्रकरणात अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील बाजीराव रोडवर रक्ताचा सडा! मित्रांनी केलेली चूक मयंकच्या जिवावर बेतली, हल्ल्याच्या 48 तास आधी काय झालं होतं?
Next Article
advertisement
BMC Election : मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
मुंबईत मोठी घडामोड, दोन वॉर्डमधून महायुती 'आऊट', बीएमसी निवडणुकीत मोठा उलटफेर
  • आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • मात्र, मतदानापूर्वीच महायुतीला दोन जागांवर मोठा धक्का बसला आहे.

  • दोन जागांवर महायुतीचे उमेदवार नाहीच.

View All
advertisement