Pune Crime : कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला, रस्त्यात अडवलं, वाद पेटला अन् सपासप वार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Kothrud Koyta Attack : हल्ला इतका भीषण होता की, आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Pune Kothrud Crime : पुण्यातील कोथरूड परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, हा प्रकार भररस्त्यात घडला आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
कोथरूड भागातून जात होता, तेव्हा...
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाच्या शाळेत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून दोन तरुणांनी त्याला लक्ष केले. 17 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जेव्हा तो मुलगा कोथरूड भागातून जात होता, तेव्हा त्याला अडवण्यात आले. स्वामी समर्थ मठाजवळ गाठून आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
advertisement
तीक्ष्ण शस्त्राने वार
हा हल्ला इतका भीषण होता की, आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बलराम हनुमंत लोखंडे (वय 24) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
advertisement
शाळेतल्या भांडणामुळे रक्तरंजित हल्ला
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. भरवस्तीत अशा प्रकारे शाळकरी मुलावर हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या भांडणामुळे हा रक्तरंजित हल्ला झाला असून आरोपी सध्या पसार झाले आहेत.
advertisement
शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना
या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. शाळकरी मुलांमधील हा वाद विकोपाला गेल्याने परिसरातून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 7:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला, रस्त्यात अडवलं, वाद पेटला अन् सपासप वार!









