Pune Crime : लग्न ठरलं, पुण्याहून मुंबईला निघाली! होणाऱ्या नवऱ्यादेखत महिलेसोबत नको ते घडलं
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime News : पूजाला त्वरित चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिचा डोळा वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया केली गेली.
Pune Crime News (गोविंद वाकडे, प्रतिनिधी) : पुण्याजवळ कात्रज-देहू रस्ता बाह्यवळण मार्गावर एका किरकोळ घटनेनंतर झालेल्या हल्ल्यात मुंबईतील एका 28 वर्षीय तरुणीच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीवर तातडीची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. मोटारीतील एका व्यक्तीच्या पायावरून चाक गेल्याच्या कथित कारणावरून दुचाकीवरील तीन तरुणांनी त्यांच्या मोटारीचा पाठलाग केला, दगडफेक केली आणि काचा फोडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आठवडा उलटून गेला तरी दृष्टी आली नाही
पेशाने एचआर असलेल्या तरुणीवर झालेला हा हल्ला जीवघेणा ठरला असता. हल्ला झाल्यानंतर आठवडा उलटून गेला तरीही आपली दृष्टी परत आली नसल्याचे त्या तरुणीने सांगितले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र कायद्यानुसार नोटीस देऊन त्यांना सोडून देण्यात आले आहे.
गाडीच्या उर्वरित काचा फोडल्या
advertisement
या तरुणांनी त्या जोडप्याला शिवीगाळ केली आणि एकाने मोटारीच्या समोरील काचेवर दगड फेकला, ज्यामुळे काच फुटली. भीतीपोटी हे जोडपे गाडी चालवत पुढे गेले, पण पुनावळे येथील भुयारी मार्गाजवळ वाहतूक कोंडीत अडकले. त्याच वेळी त्या तिघांनी पुन्हा त्यांचा पाठलाग केला आणि गाडीच्या उर्वरित काचा आणि मागील काचही फोडल्या. काच फुटल्यामुळे त्याचे तुकडे उडून पूजाच्या डाव्या डोळ्यात घुसले आणि तिला गंभीर दुखापत झाली. तिला त्वरित चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिचा डोळा वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया केली.
advertisement
दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार
गुप्ता यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर आठवडा झाला तरीही त्यांना दृष्टी परत मिळालेली नाही. डॉक्टरांनी एका शस्त्रक्रियेत काम होईल असे सांगितले होते, पण दृष्टी परत न आल्यास दुसरी शस्त्रक्रिया करावी लागेल, अशी पूर्वसूचनाही त्यांनी दिली होती. "डोळ्यात रक्त जमा झाल्यामुळे माझी दृष्टी पूर्णपणे परत येईल की नाही, याबद्दल डॉक्टर निश्चित नाहीत," असं गुप्ता यांनी रविवारी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
advertisement
आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी
दरम्यान, गुप्ता यांनी पोलिसांकडे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, पण तो दाखल झाला नाही. गंभीर दुखापत होऊनही आरोपींना घरी जाऊ दिले गेले, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. "या आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, जेणेकरून दुसऱ्याला दुखापत करण्यापूर्वी ते दोनदा विचार करतील," असं मत त्यांनी व्यक्त केले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 1:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : लग्न ठरलं, पुण्याहून मुंबईला निघाली! होणाऱ्या नवऱ्यादेखत महिलेसोबत नको ते घडलं










