Pune News : नवऱ्याला मारलं,बाईचं डोकं फोडलं, पुण्यात 15 जणांच्या टोळक्याने दाम्पत्याला बेदल चोपलं, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत दुकान लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका दाम्पत्याला 10 ते 15 जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Pune News : अभिजीत पोटे, प्रतिनिधी पुणे: पुण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत दुकान लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका दाम्पत्याला 10 ते 15 जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत पुरूषाच्या अंगावर मारहाणीचे व्रण उठेले आहेत तर महिलेच्या डोक्याला टाके पडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्याच्या विश्रामाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील तुळशीबागेत ही घटना घडली आहे. या परिसरात गेल्या दहा वर्षापासून पीडित दाम्पत्य आपलं दुकान लावतात.या दुकानाच्या माध्यमातूनच ते आपले घर चालवतात. पण आज अचानक एक टोळी त्यांच्या दुकानावर आली आणि तिने सूरूवातीला "तुम्ही बाहेरून आला आहात तिथे दुकानात लावू नका" अशा प्रकारची धमकी दिली होती.
advertisement
या धमकीनंतर पीडित दाम्पत्याचा दुकानावर टोळीसोबत वाद झाला.या वादातून टोळीने लाकडीने आणि इतर माध्यमातून या दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.या मारहाणीत पुरूषाच्या अंगावर मारहाणीचे व्रण उठले आहेत तर महिलेच्या डोक्याला टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ माजली आहे.
advertisement
या प्रकरणातील पिडीत पुरूष या घटनेवर म्हणाला की, आम्हाला बेदम मारहाण करण्यात आली. माझ्या बायकोच्या डोक्याला तीन टाके पडल्याचेही त्याने सांगितले. तर 15 जण हातात लाकडे घेऊन आली होती, या सगळ्यांनी आम्हा दोघांना मारहाण केली, असे पिडित महिलेने हॉस्पिटलच्या बेडवरून सांगितले आहे. या घटनेने संताप होत आहे.
advertisement
या प्रकरणी सध्या पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तक्रारीवनंतर एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 20, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : नवऱ्याला मारलं,बाईचं डोकं फोडलं, पुण्यात 15 जणांच्या टोळक्याने दाम्पत्याला बेदल चोपलं, नेमकं काय घडलं?