Pune Crime : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिंपरीत मर्डर, थेट घरात घुसून मारलं, खुन्नस भारी पडली,शहर हादरलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पिंपरी चिंचवडमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाची कोयत्याने हत्या केल्याची घटना घडली आहे. वैभव भागवत थोरात असे (25 वर्षीय) मृत तरुणाचे नाव आहे.
Pune Crime News : गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाची कोयत्याने हत्या केल्याची घटना घडली आहे. वैभव भागवत थोरात असे (25 वर्षीय) मृत तरुणाचे नाव आहे. नागसेन नगर झोपडपट्टीमध्ये ही घटना घडली आहे.पुर्वेवैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील नागसेन नगर झोपडपट्टीमध्ये ही घटना घडली आहे. मृत वैभव थोरात हा याच झोपडपट्टीत राहायचा. आज दुपारच्या सुमारास तो आपल्या खोलीत बसलेला असताना 4 जण त्यांच्या घरात घूसले आणि त्यांनी कोयत्याने हल्ला चढवायला सूरूवात केली.या हल्ल्यात चौघांनी वैभवच्या हातावर, शरीरावर आणि डोक्यावर कोयत्याने हल्ला केला होता. हा हल्ला इतका भीषण होता की या घटनेत वैभव थोरातचा मृत्यू जागीच मृत्यू झाला होता.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत चार आरोपींना ताब्यात घेतले होते.योगेश अनंत गायकवाड,अनिल आनंद बनसोडे,महेश अप्पालाल कोळी आणि एक अल्पवयीन अशी या मुलांची नावे होती. या अटकेतील आरोपींपैंकी योगेश गायकवाडचा मृत वैभव थोरातशी जूना वाद होता.याच वादातून आरोपींनी वैभवची कोयत्याने हल्ला करून हत्या केल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरूणाला फसवलं
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. सोशल मीडियावर ओळख करून ती तरुणांशी मैत्री करीत होती नंतर शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करत शिवाय खोटी बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पैसे मागत होती.या प्रकरणात तरुणीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहिती अशी आहे की या तरुणीने तब्बल तीन तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवून पैसे उकळले.
advertisement
याप्रकरणी आंबेगाव येथील 31 वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 5 नोव्हेंबर 2023 ते 7 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली. फिर्यादी तरुण विवाहित असून तो एसआरपीएफमध्ये जवान आहे.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
September 22, 2025 7:28 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिंपरीत मर्डर, थेट घरात घुसून मारलं, खुन्नस भारी पडली,शहर हादरलं