Abhishek Sharma : पाकिस्तानला धुतल्यानंतर अभिषेकचं 'L सेलिब्रेशन', स्वत: कॅप्टनला सांगितला खरा अर्थ!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता.
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या टीम इंडियाच्या दोन्ही ओपनरचे पाकिस्तानी फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी आणि हारिस राऊफ यांच्यासोबत वाद झाले. अखेर अंपायरला या वादात मध्यस्थी करून दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना बाजूला करावं लागलं.
पाकिस्तानचा बॅटर साहबजादा फरहानने अर्धशतकानंतर एके-47 स्टाईलने सेलिब्रेशन केलं. तर हारिस राऊफने फिल्डिंग करत असताना भारतीय प्रेक्षकांना विमान पडल्याचे इशारे करून डिवचलं, त्यामुळे दुबईच्या मैदानातील वातावरण तापलं होतं.
पाकिस्तानने दिलेल्या 172 रनच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना अभिषेक शर्माने पहिल्या बॉलपासूनच आक्रमण सुरू केलं. अभिषेक शर्माने इनिंगच्या पहिल्याच बॉलला शाहिन आफ्रिदीला खणखणीत सिक्स मारली. अभिषेक शर्माने 39 बॉलमध्ये 74 रन केले, ज्यात 5 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. अर्धशतक केल्यानंतर अभिषेक शर्माने हाताने L दाखवत सेलिब्रेशन केलं. मॅच संपल्यानंतर अभिषेक शर्माने त्याच्या या सेलिब्रेशनचा अर्थही सांगितला.
advertisement
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये सूर्याने अभिषेकला त्याच्या L सेलिब्रेशनचा अर्थ विचारला. L म्हणजे लव्ह. हे सेलिब्रेशन त्यांच्यासाठी होतं, जे भारतीय टीमवर प्रेम करतात. आयपीएलमध्येही मी चाहत्यांसमोर असंच सेलिब्रेशन करतो, असं अभिषेक शर्मा म्हणाला आहे.
अभिषेकचा पाकिस्तानवर निशाणा
मॅचनंतर अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या टीमवरही निशाणा साधला. 'पाकिस्तानी खेळाडू काहीही कारण नसताना आमच्या अंगावर येत होते. मला हे अजिबात आवडलं नाही, त्यामुळे मी त्यांच्यावर आक्रमण केलं. मला टीमसाठी कामगिरी करायची होती', असं प्रत्युत्तर अभिषेक शर्माने त्याच्या अर्धशतकानंतर दिलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : पाकिस्तानला धुतल्यानंतर अभिषेकचं 'L सेलिब्रेशन', स्वत: कॅप्टनला सांगितला खरा अर्थ!