बॅगेत चार लाखांचे दागिने घेऊन रिक्षाने प्रवास; स्वारगेटवर उतरताच ते दृश्य पाहून सरकली महिलेच्या पायाखालची जमीन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
स्वारगेट स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांना दागिने गायब असल्याचे लक्षात आले. सुमारे ३ लाख ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी शिताफीने लंपास केले
पुणे : पुणे शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता चोरीची आणखी एक घटना समोर आली आहे. यामुळे रिक्षाने प्रवास करताना प्रवाशांनी सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बारामती येथील एक ५५ वर्षीय महिला १७ डिसेंबर रोजी आपल्या पतीसोबत वैयक्तिक कामासाठी पुण्यात आल्या होत्या. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी शिवाजीनगर येथून स्वारगेट एसटी स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. आपल्याकडील मौल्यवान दागिने सुरक्षित राहावेत म्हणून त्यांनी ते एका डब्यात घालून पिशवीच्या आत ठेवले होते.
मात्र, स्वारगेट स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांना दागिने गायब असल्याचे लक्षात आले. सुमारे ३ लाख ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी शिताफीने लंपास केले. याप्रकरणी महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
advertisement
चोरीची दुसरी घटना कात्रज-आंबेगाव परिसरात घडली. येथे मॉर्निंग वॉक किंवा बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास, एक ज्येष्ठ नागरिक जांभुळवाडी रोडवर एसटी बसची वाट पाहत उभे होते. परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील ६० हजार रुपयांची सोनसाखळी जोरात हिसकावून नेली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 8:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
बॅगेत चार लाखांचे दागिने घेऊन रिक्षाने प्रवास; स्वारगेटवर उतरताच ते दृश्य पाहून सरकली महिलेच्या पायाखालची जमीन







