advertisement

Pune Crime: पुणे हादरलं! भांड्यासाठी वाघोलीतील नवरा-बायकोचं धक्कादायक कृत्य; शेजाऱ्याचा जीवच घेतला

Last Updated:

राठोड हे कामानिमित्त पुण्यात आले होते आणि वाघोलीतील आव्हाळवाडी भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होते. त्यांच्या शेजारीच आनंद रवींद्र वर्मा (वय २६) आणि शीला आनंद वर्मा (वय २४) हे दाम्पत्य वास्तव्यास आहे

दाम्पत्याकडून व्यक्तीची हत्या (AI Image)
दाम्पत्याकडून व्यक्तीची हत्या (AI Image)
पुणे : संताप अनावर झाल्यामुळे माणसाचा विवेक कसा सुटतो, याचा एक भीषण प्रत्यय पुण्यातील वाघोली परिसरात आला आहे. शेजाऱ्याकडे दिलेली भांडी आणि गृहोपयोगी वस्तू परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेत ५८ वर्षीय व्यक्तीला इतकी बेदम मारहाण करण्यात आली की त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी एका दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
भास्कर मोहन राठोड (वय ५८, मूळ रा. जिंतूर, परभणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राठोड हे कामानिमित्त पुण्यात आले होते आणि वाघोलीतील आव्हाळवाडी भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होते. त्यांच्या शेजारीच आनंद रवींद्र वर्मा (वय २६) आणि शीला आनंद वर्मा (वय २४) हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी राठोड यांनी विश्वासाने आपले काही गृहोपयोगी साहित्य आणि भांडी वर्मा दाम्पत्याकडे ठेवण्यासाठी दिली होती.
advertisement
वादाचे रूपांतर खुनात
१६ फेब्रुवारी रोजी भास्कर राठोड यांनी आपली भांडी आणि साहित्य वर्मा दाम्पत्याकडे परत मागितले. मात्र, ही क्षुल्लक मागणी वर्मा दाम्पत्याला इतकी झोंबली की त्यांनी राठोड यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि या दाम्पत्याने राठोड यांना अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण केली. या मारहाणीत राठोड यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
दाम्पत्याला अटक
या घटनेनंतर वाघोली पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून आरोपी आनंद वर्मा आणि शीला वर्मा या दोघांना अटक केली आहे. किरकोळ भांड्यांच्या वादातून एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेणाऱ्या या दाम्पत्याच्या कृत्यामुळे आव्हाळवाडी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक शहादेव शहाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुणे हादरलं! भांड्यासाठी वाघोलीतील नवरा-बायकोचं धक्कादायक कृत्य; शेजाऱ्याचा जीवच घेतला
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement