Pune Crime : आयुष कोमकर फक्त ट्रेलर, खरा पिक्चर तर वेगळाच होता; पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितला आंदेकर टोळीचं मेन टार्गेट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Police Press Conference Ayush Komkar Murder Case : पोलिसांच्या माहितीनुसार, आंदेकर टोलीचं मेन टार्गेट हे सोमनाथ गायकवाड यांचे कुटुंब होते. पोलिसांनी या प्रकरणातील आणखी 5 आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Ayush Komkar Murder Case : पुण्यात झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. या घटनेत गोळीबार करणारे यश पाटील आणि अमन पठाण यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच, त्यांना शस्त्रे पुरवणारे आणि घटनास्थळाची रेकी करणारे अमित पाटोळे आणि सुजल मेरगुळ यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची (Pune Police Press Conference) माहिती दिली आहे.
8 जणांना अटक, 5 आरोपी फरार
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या प्रमुख आरोपींमध्ये सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी निलंजय वाडेकर यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आंदेकर टोलीचं मेन टार्गेट हे सोमनाथ गायकवाड यांचे कुटुंब होते. पोलिसांनी या प्रकरणातील आणखी 5 आरोपींचा शोध सुरू केला आहे. यामध्ये कृष्णा आंदेकर, शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांचा समावेश आहे. हे आरोपी अजूनही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
advertisement
कुणाला अटक केली?
आयुष कोमकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण, सुजल मेरगु, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना अटक केली आहे. तर आंदेकर कुटूंब फरार असल्याची माहिती मिळाली आहे.
सोशल मीडियावर रिल्सला मज्जाव
दरम्यान, पुणे पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित लोकांना आवाहन केलं आहे की, जर कोणाला या टोळीबद्दल काही तक्रार करायची असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच, सोशल मीडियावर या टोळीबद्दल व्हिडिओ किंवा रिल्स अपलोड करणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
advertisement
बंडू आंदेकरचा सेफ गेम
बंडू आंदेकरला पोलिसांनी अटक केली असली तरी त्याने आयुष कोमकरची हत्या घडवून आणण्यापूर्वीच स्वत:सह आपल्या कुटुंबीयांचा एक्झिट प्लॅन रेडी केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. गेल्या वर्षी बंडू आंदेकरचा मुलगा आणि नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती. आपण कोणतंही बेकायदेशीर कृत्य करणार नाही. बदला घेणार नाही, असं बंडू आंदेकरने सांगितलं होतं. आजोबानेच नातवाचा जीव घेतला, हे स्पष्ट असलं तरी देखील ही हत्या घडवून आणताना बंडू आंदेकरने स्वत:सह आपल्या कुटुंबाला सेफ ठेवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. कारण प्रत्यक्षात हल्ला करणाऱ्यांमध्ये एकही जण आंदेकर कुटुंबाच्या रक्तातील नात्याचा नाही, अशी माहिती समोर आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 09, 2025 2:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : आयुष कोमकर फक्त ट्रेलर, खरा पिक्चर तर वेगळाच होता; पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितला आंदेकर टोळीचं मेन टार्गेट!