पुणे हादरलं! विकीनं घर बदललं पण त्यांनी शोधलंच; वाघोलीतील तरुणाची घरात घुसून हत्या, धक्कादायक कारण समोर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपी आपला 'गेम' (हत्या) करण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागताच, जीव वाचवण्यासाठी विकी वाघोलीतील आरपीएस हेरिटेज सोसायटीत राहण्यासाठी आला होता.
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पुणे शहरातील चंदननगर परिसरात झालेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी वाघोली येथे एका २१ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणात वाघोली पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत लातूर येथून दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
मयत तरुणाचे नाव विकी विजय दिवटे (२१) असे असून, तो मूळचा चंदननगरचा रहिवासी होता. विकी आणि आरोपी यांच्यात चंदननगरमध्ये राहताना गंभीर भांडणे झाली होती. या वादातून विकीने आरोपींना मारहाण केली होती, ज्याची नोंद पोलीस ठाण्यातही झाली होती. आरोपी आपला 'गेम' (हत्या) करण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागताच, जीव वाचवण्यासाठी विकी वाघोलीतील आरपीएस हेरिटेज सोसायटीत राहण्यासाठी आला होता.
advertisement
आरोपी विकीच्या मागावरच होते. २४ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पाच जणांचे टोळके वाघोलीतील त्याच्या फ्लॅटमध्ये शिरले. तिथे झालेल्या वादावादीत आरोपींनी धारदार शस्त्राने विकीचा गळा चिरून त्याला जागीच ठार केले आणि तेथून पळ काढला.
लातूरमधून आरोपींना बेड्या: याप्रकरणी विकीची आई नंदा दिवटे यांनी फिर्याद दिली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे वाघोली पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला आणि कैलास विठ्ठल राठोड (१९), सुशील ऊर्फ अण्णा कदम, गणेश कट्टे आणि दोन अल्पवयीन मुलांना लातूरमधून ताब्यात घेतले. जुन्या वैमनस्यातून हा टोकाचा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! विकीनं घर बदललं पण त्यांनी शोधलंच; वाघोलीतील तरुणाची घरात घुसून हत्या, धक्कादायक कारण समोर









