Pune Cyber Fraud: पुणेकरांनो गाडीचं ई-चालान भरताना सावधान; ही चूक करू नका, एका मिनिटात 5 लाखांचा गंडा

Last Updated:

"आम्ही मुंबई आरटीओ कार्यालयातून बोलत आहोत, तुमच्या गाडीवर मोठं ऑनलाइन चलन (दंड) प्रलंबित आहे," अशी बतावणी चोरट्यांनी केली.

 ई-चालान भरताना सावधान (प्रतिकात्मक फोटो)
ई-चालान भरताना सावधान (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: शहरात सायबर चोरट्यांनी आता फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधल्या आहेत. आरटीओ अधिकारी असल्याचे भासवून आणि बनावट लिंक पाठवून दोन नागरिकांना तब्बल पावणेनऊ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. सिंहगड रोड आणि पाषाण परिसरात या घटना घडल्या असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरटीओ 'चलन'च्या बहाण्याने ५ लाखांची फसवणूक
सिंहगड रोडवरील आनंदनगर येथे राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीला सायबर भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढलं. "आम्ही मुंबई आरटीओ कार्यालयातून बोलत आहोत, तुमच्या गाडीवर मोठं ऑनलाइन चलन (दंड) प्रलंबित आहे," अशी बतावणी चोरट्यांनी केली.
दंडाची भीती दाखवून चोरट्यांनी तक्रारदाराला काही तांत्रिक कृती करण्यास भाग पाडलं आणि त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये आयएमपीएस (IMPS) द्वारे दुसऱ्या खात्यात वळवून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
एका लिंकमुळे ३.८३ लाखांचा फटका
दुसरी घटना पाषाणमधील आर्मामेंट इस्टेट परिसरात घडली आहे. येथील एका रहिवाशाच्या मोबाइलवर १६ डिसेंबर रोजी एक अज्ञात लिंक आली होती. काहीही विचार न करता तक्रारदाराने त्या लिंकवर क्लिक केलं. लिंक ओपन होताच त्यांच्या बँक खात्याचा ताबा चोरट्यांकडे गेला आणि काही वेळातच खात्यातून ३ लाख ८३ हजार ८२२ रुपये डेबिट झाले. या धक्कादायक प्रकारानंतर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
advertisement
सायबर सुरक्षिततेसाठी पोलिसांचे आवाहन:
आरटीओ कॉल: आरटीओ किंवा पोलीस कधीही फोन करून दंड भरण्यासाठी वैयक्तिक बँक खात्यात पैसे मागत नाहीत. अधिकृत सरकारी वेबसाइटवरच (Mparivahan) दंडाची खात्री करा.
अज्ञात लिंक: लॉटरी, केवायसी अपडेट किंवा रिवॉर्ड पॉईंट्सच्या नावाखाली येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. फोनवर कोणालाही आपला ओटीपी (OTP), पिन किंवा बँक डिटेल्स देऊ नका. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Cyber Fraud: पुणेकरांनो गाडीचं ई-चालान भरताना सावधान; ही चूक करू नका, एका मिनिटात 5 लाखांचा गंडा
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement