Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत महत्त्वाची अपडेट, जमीन मोजणीस प्रारंभ, किती शेतकऱ्यांची संमती?

Last Updated:

Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे. शेतकऱ्यांची सहमतीपत्र देण्याची वाढीव मुदत संपली असून 26 सप्टेंबरपासून जमीन मोजणीस प्रारंभ झाला आहे.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत महत्त्वाची अपडेट, जमीन मोजणीस प्रारंभ, किती शेतकऱ्यांची संमती?
Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत महत्त्वाची अपडेट, जमीन मोजणीस प्रारंभ, किती शेतकऱ्यांची संमती?
पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण 3 हजार एकर जमिनीतून तब्बल 2 हजार 810 एकर जमिनीबाबत शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर केली आहेत. म्हणजेच सुमारे 93 टक्के जमीन संपादनासाठी सहमती मिळाल्याचे चित्र आहे. संमतीपत्रे सादर करण्याची वाढीव मुदत गुरुवारी ( 25 सप्टेंबर) संपली आहे. त्यानंतर आता जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही कामे आजपासून म्हणजेच 26 सप्टेंबरपासून हाती घेण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिली.
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांची संमती
पुरंदर तालुक्यातील पारगाव मुंजवडी, उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी, वनपुरी आणि कुंभारवळण या सात गावांतून प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे 3 हजार एकर जमिन घेण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना संमतीपत्रे सादर करण्यासाठी 26 ऑगस्ट ते 18 सप्टेंबरपर्यंत कालावधी देण्यात आला होता. या काळात तब्बल 2 हजार 80 शेतकऱ्यांनी पुढाकार घेत 2 हजार 700 एकर जमिनीबाबत संमती दिली. मात्र, जवळपास 300 एकर जमिनीबाबत संमतीपत्रे प्राप्त झाली नाहीत. ज्यांनी होकार दिला नाही, त्या शेतकऱ्यांना विकसित भूखंडाचा लाभ मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
advertisement
विमानतळासाठी 93 टक्के जमीन संपादनास संमती
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहमती दर्शविली आहे. सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली नसल्याने त्यांनाही लाभ मिळावा, यासाठी मुदतवाढ मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने ही मुदत गुरुवारपर्यंत (25 सप्टेंबर) वाढविली.या वाढीव मुदतीत आणखी संमतीपत्रे सादर झाल्याने आतापर्यंत 2 हजार 810 एकर क्षेत्रासाठी परवानगी मिळाली आहे. एकूण 3 हजार 220 शेतकऱ्यांनी भूसंपादनास होकार दिला असून, यामुळे प्रस्तावित क्षेत्राच्या तब्बल 93 टक्के भागाला संमती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढे संमतीपत्रे सादर करण्यासाठी कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
advertisement
पुरंदर तालुक्यातील मुंजवडी, उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी, वनपुरी आणि कुंभारवळण या गावांमधून जवळपास 99 टक्के शेतकऱ्यांनी विमानतळ प्रकल्पासाठी संमतीपत्रे सादर केली आहेत. तर पारगाव येथून 85 टक्क्यांहून अधिक क्षेत्राबाबत संमती मिळाल्याचे चित्र आहे. आजपासून (26 सप्टेंबर) जमिनीच्या मोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत महत्त्वाची अपडेट, जमीन मोजणीस प्रारंभ, किती शेतकऱ्यांची संमती?
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement