मुलीच्या दुर्धर आजारावर उपचाराचं आमिष; कोथरूडमध्ये अभियंता दाम्पत्याची 14 कोटींची फसवणूक, अशी झाली पोलखोल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कोथरूड येथील एक संगणक अभियंता (Computer Engineer) आणि त्यांच्या पत्नीची तब्बल 14 कोटी 39 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे
पुणे : दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या मुलीचं आजारपण बरं करण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कोथरूड येथील एक संगणक अभियंता (Computer Engineer) आणि त्यांच्या पत्नीची तब्बल 14 कोटी 39 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींकडून आतापर्यंत 54 लाख रुपये जप्त केले आहेत.
या गुन्ह्यामध्ये वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय 41), तिचा पती कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय 42, दोघे रा. कोथरूड) आणि दीपक जनार्दन खडके (वय 65, रा. नाशिक) या तिघांना अटक करण्यात आली आहे. वेदिकाच्या आई आणि भावावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी फसवणुकीची ही रक्कम विविध ठिकाणी वळवली असून एकूण १ हजार १३९ व्यवहार संशयित स्वरूपाचे असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींच्या ३९ बँक खात्यांची माहिती मागवली होती, त्यापैकी १३ खात्यांतील व्यवहारांचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
आरोपींनी फसवणुकीच्या या पैशातून काही मालमत्ता आणि वाहने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
advertisement
दरम्यान, आरोपींचे वकील यांनी वेदिका पंढरपूरकर आणि दीपक खडके यांच्या तात्पुरत्या जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पोलीस सध्या या कोट्यवधींच्या फसवणुकीचा सखोल तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 28, 2025 11:10 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुलीच्या दुर्धर आजारावर उपचाराचं आमिष; कोथरूडमध्ये अभियंता दाम्पत्याची 14 कोटींची फसवणूक, अशी झाली पोलखोल


