फॉर्च्युनरमध्ये बसवून डोक्यात घातली गोळी, दोस्तीत कुस्ती करणारा अखेर अटकेत, लोणावळ्यात...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Pune Fortuner Car CCTV VIDEO: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी येथील चऱ्होली येथे बुधवारी सायंकाळी दोन मित्रांनी आपल्या मित्राला फॉर्च्युनर कारमध्ये बसवून डोक्यात गोळी मारली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Pune Fortuner Car Murder Case: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी येथील चऱ्होली येथे बुधवारी सायंकाळी एक हत्येची घटना उघडकीस आली होती. दोन मित्रांनी आपल्या मित्राला फॉर्च्युनर कारमध्ये बसवून त्याच्या डोक्यात गोळी मारली होती. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी घटनास्थळीच मित्राला टाकून त्याच्या अंगावरून कार चालवली होती. हत्येची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. हे हत्याकांड घडवणाऱ्या आरोपीला आता अटक केली आहे.
विक्रांत ठाकूर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला लोणावळ्यातील अँबी व्हॅली परिसरातून अटक केली आहे. दुसरा आरोपी अमित पठारे अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. तर नितीन गिलबिले असं खून झालेल्या 37 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. दोन्ही आरोपी आणि मयत तिघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. तिघेही जमीनीच्या प्लॉटींग व्यवसायात होते.
advertisement
नेमकं काय घडलं?
बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आळंदी दिघी रस्त्यावर नितीन गिलबिले या तरुणाची त्याच्याच मित्रांनी गोळ्या झाडून हत्या केली. अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर या दोघांनी मिळून हे क्रूर कृत्य केलं. जमिनीच्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील वादातून हा खून झाल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. नितीन गिलबिले, अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे तिघे मित्र सायंकाळच्या सुमारास आळंदी दिघी रस्त्याच्या कडेला एका चारचाकी गाडीत बसून गप्पा मारत होते. याचवेळी अमित पठारे आणि विक्रांत यांनी त्यांच्याकडील पिस्तूल काढले आणि नितीनच्या डोक्यात गोळी झाडली. या हल्ल्यात नितीनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच आरोपी अमित आणि विक्रांत तिथून पळून गेले.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार, जागेच्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील वाद हे या गोळीबारामागील कारण असू शकते. मृतक नितीन गिलबिले आणि आरोपी मित्र अमित पठारे व विक्रांत ठाकूर हे तिघेही जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. याच व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनीच मित्राची हत्या केल्याने अनेकांने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 14, 2025 1:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
फॉर्च्युनरमध्ये बसवून डोक्यात घातली गोळी, दोस्तीत कुस्ती करणारा अखेर अटकेत, लोणावळ्यात...

