Pune Ganpati : पुण्यात गणेशोत्सवाआधीच गणेश मंडळांमध्ये वाद? मानपान आणि मतभेद, मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन कधी?

Last Updated:

Pune News : पुण्यात गणेशोत्सवाआधीच गणेश मंडळांमध्ये वाद पहायला मिळतोय. विसर्जन मिरवणुकीवरून पुण्यात मंडळांमध्ये मानपान आणि मतभेद पहायला मिळत आहे.

Pune Ganpati Utasav Controversy
Pune Ganpati Utasav Controversy
Pune Ganpati Utasav : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला खरं तर काहीच अवधी उरलेला आहे. पुण्यातील गणेशोत्सव जगभरातील गणेशभक्तांसाठी पर्वणी असते. सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी तसेच पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक पुण्यात येत असतात. अशातच आता विसर्जन मिरवणुकीवरून पुण्यात मंडळांमध्ये मानपान आणि मतभेद पहायला मिळत आहे. नेमकं कारण काय? नेमका वाद काय आहे? जाणून घ्या.

मानाच्या गणपती आधीच विसर्जन मिरवणूक

विसर्जन मिरवणुकीवरून पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मतभेद पहायला मिळत आहे. अनेक मंडळानी एकत्रित येत अनेक वेगळे निर्णय घेतले असल्याने हा वाद झाल्याचं पहायला मिळत आहे. आम्ही आधी विसर्जन मिरवणुक काढू, असं काही मंडळ म्हणत आहेत. तर तब्बल 100 मंडळानी मानाच्या गणपती मंडळाच्या आधीच विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement

मंडळांमध्ये मानपान आणि मतभेद

विर्सजनामुळे सुरू असेल्या वादावरून पुण्यात पुन्हा बाप्पाच्या मंडळांमध्ये मानपान आणि मतभेद पहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाची पुण्यातील विसर्जन मिरवणूक कशी पार पडणार? असा सवाल विचारला जात आहे. दरवर्षी प्रमाणे पुण्यातील मिरवणूक शांततेत पार पडावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

मिरवणुकीला सर्वात जास्त डीजेचा वापर

advertisement
दरम्यान, ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी गणेशोत्सवानिमित्त मोठा निर्णय घेतला होता. जे गणपती मंडळ डीजे लावतील त्यांना देणगी न देण्याचा निर्णय पुण्यातील उद्योजक सुनीत बालन यांनी घेतला आहे. शेवटच्या दिवशी म्हणजेच मिरवणुकीला सर्वात जास्त डीजेचा वापर केला जातो. अशातच मिरवणुकीत ढोल ताशांचा वापर केला जावा यासाठी पुनीत बालन यांना हा निर्णय घेतलाय.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Ganpati : पुण्यात गणेशोत्सवाआधीच गणेश मंडळांमध्ये वाद? मानपान आणि मतभेद, मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन कधी?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement