रस्त्यात अडवून पुण्यातील तरुणीकडे मागितले 20 लाख रुपये, नकार मिळताच तरुणानं केलं असं कृत्य की खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात आरोपीने एका 24 वर्षीय तरुणीचा सतत पाठलाग करून तिला २० लाख रुपयांची खंडणी मागितली.
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 24 वर्षीय तरुणीचा सतत पाठलाग करून तिला २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने या आरोपीने तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची मोठी बदनामी केली. याप्रकरणी पोलिसांनी विजयसिंह संतोष गुंड (वय ३०, रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार २५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होता. आरोपी विजयसिंह हा गेल्या काही महिन्यांपासून पीडित तरुणीचा सतत पाठलाग करत होता. त्याने तरुणीला रस्त्यात अडवून तिच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली. "जर पैसे दिले नाहीत, तर तुझे खाजगी फोटो सार्वजनिक करेन," अशी धमकी त्याने दिली होती. तरुणीने या मागणीला भीक न घातल्याने संतापलेल्या आरोपीने तिचे काही अश्लील फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले.
advertisement
फोटोंमुळे आपली बदनामी होत असल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने धीर एकवटून वारजे माळवाडी पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास पथके रवाना केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी विजयसिंह गुंड याला बेड्या ठोकल्या.
हा नराधम गेल्या तीन महिन्यांपासून तरुणीला मानसिक त्रास देत असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 9:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रस्त्यात अडवून पुण्यातील तरुणीकडे मागितले 20 लाख रुपये, नकार मिळताच तरुणानं केलं असं कृत्य की खळबळ










