"महाराज, कार्यक्रम बंद करा"; हडपसरमध्ये पोलिसांनी मध्येच थांबवलं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन, काय घडलं?

Last Updated:

रस्त्याच्या मधोमध कार्यक्रम असल्याने, श्रीराम चौक ते हडपसर दरम्यानच्या रस्त्यावर वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी झाली.

इंदुरीकर महाराजांचं कीर्तन थांबवलं (फाईल फोटो)
इंदुरीकर महाराजांचं कीर्तन थांबवलं (फाईल फोटो)
पुणे : पुणे शहरात सध्या महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण आहे. अशातच हडपसर येथील हांडेवाडी रस्त्यावर एका राजकीय इच्छुक कार्यकर्त्याने प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र, हा कार्यक्रम आयोजित करताना आयोजकांनी चक्क श्रीराम चौकाजवळील वाहतुकीचा मुख्य रस्ताच अडवला. ज्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून कार्यक्रम थांबवावा लागला.
हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकात हा कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काळेपडळ (प्रभाग क्र. ४१) येथील एका इच्छुक कार्यकर्त्याने नागरिकांसाठी या कीर्तनाचं आयोजन केलं होतं. रस्त्याच्या मधोमध कार्यक्रम असल्याने, श्रीराम चौक ते हडपसर दरम्यानच्या रस्त्यावर वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी झाली.
advertisement
या वाहतूक कोंडीमुळे नागरिक संतप्त झाले. अखेरीस, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी त्यांनी थेट कीर्तन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन महाराजांना उद्देशून "महाराज, कार्यक्रम बंद करा" असं सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आयोजकांना कार्यक्रम काही काळासाठी थांबवावा लागला. पोलिसांनी वाहतूक थांबलेला रस्ता मोकळा करून घेतल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली.
advertisement
आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे वाहतुकीचा रस्ता अडवून कार्यक्रम केल्याने हजारो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करणं भाग पडलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
"महाराज, कार्यक्रम बंद करा"; हडपसरमध्ये पोलिसांनी मध्येच थांबवलं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन, काय घडलं?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement