advertisement

Hinjewadi Accident: 'आईसोबत गणपती आणायला गेली', हिंजवडीत मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 वर्षीय मुलीचा मृत्यू; CCTV समोर

Last Updated:

Hinjewadi Accident: हिंजवडी पोलिसांनी ट्रक मिक्सर चालकासह त्याच्या मालकावरही गुन्हा दाखल केला आहे.

News18
News18
पिंपरी-चिंचवड: गेल्या काही वर्षांपासून आय टी नगरी हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात अवजड वाहने बेदरकारपणे चालवल्यामुळे अनेक जीवांचे बळी गेले आहेत. वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे अवघ्या एका महिन्यात तीन जणांचा बळी गेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका धक्कादायक अपघातात अकरा वर्षीय प्रत्युषा संतोष बोराटे हिने जीव गमावला. या प्रकरणी आता हिंजवडी पोलिसांनी ट्रक मिक्सर चालकासह त्याच्या मालकावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मिक्सर ट्रक चालक फरहान मुन्नू शेख, मालक - प्रदीप मारुती साठे आणि सुपरवायझर प्रसाद मंडलिक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी परिसरात या अवजड वाहनांमुळे होणारे अपघात याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रत्युषा आपल्या आईसोबत गणपती खरेदीसाठी निघाली होती. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक मिक्सरने त्यांना जोरदार धडक दिली. भीषण अपघातात ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने चिमुकली प्रत्युषाचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून ते पाहून अंगावर शहारे येतात.

मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकासह त्याच्या मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, केवळ चालकावर कारवाई करून मूळ मालक मात्र वाचवले जात असल्याचा संतप्त आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. बांधकाम प्रकल्पांसाठी अशा अवजड वाहनांचा वाहतूक मार्गांवर उच्छाद सुरू असून त्यामागे संबंधित बांधकाम व्यावसायिकांना पोलिस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही प्रत्युषाच्या पालकांनी केला आहे.
advertisement

"अन्यथाआम्ही रस्त्यावर उतरू", प्रत्युषाच्या वडिलांचा प्रशासनाला इशारा

“आमच्या मुलीचा बळी गेला, पण अजूनही रस्त्यांवर अवजड वाहनांची दहशत कायम आहे. यामागील खरे गुन्हेगार म्हणजे बांधकाम व्यावसायिकच आहेत. त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा प्रत्युषाच्या वडिलांनी दिला.

अपघाताचा CCTV Video समोर 

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

advertisement
हिंजवडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमुळे दिवस-रात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. प्रशासनाकडून कोणताही ठोस बंदोबस्त नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेवर गदा येत असून, या अपघाताने पुन्हा एकदा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Hinjewadi Accident: 'आईसोबत गणपती आणायला गेली', हिंजवडीत मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 वर्षीय मुलीचा मृत्यू; CCTV समोर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement