advertisement

Pune Fraud: हे तुमच्यासोबतही घडू शकतं; उच्चशिक्षित पुणेकर नेमकं कसं गंडतायेत? आणखी एका वकिलाला 14 कोटीचा गंडा, असा असतो 'मास्टरप्लॅन'

Last Updated:

गेल्या काही दिवसांत उच्चशिक्षित पुणेकरच सायबर चोरट्यांचे 'सॉफ्ट टार्गेट' बनत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आता आणखी एका घटनेत पुण्यातील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ वकिलाने तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार रुपये गमावले आहेत.

वकिलाला 14 कोटीचा गंडा (प्रतिकात्मक फोटो)
वकिलाला 14 कोटीचा गंडा (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर आणि सुशिक्षित लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत उच्चशिक्षित पुणेकरच सायबर चोरट्यांचे 'सॉफ्ट टार्गेट' बनत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आता आणखी एका घटनेत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आणि मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी पडून पुण्यातील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ वकिलाने तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार रुपये गमावले आहेत.
जाळ्यात कसे ओढले?
सायबर चोरट्यांनी वकिलाच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत प्रचंड नफा मिळेल, असे आमिष दाखवले. वकिलाचा विश्वास संपादन करण्यासाठी चोरट्यांनी त्यांना बनावट 'प्रॉफिट'चे मेसेज आणि आकडेवारी पाठवून जाळ्यात ओढले. या आमिषाला बळी पडून वकिलांनी वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा केले.
परताव्याचा केवळ 'भास'
वकिलांनी पैसे जमा केल्यानंतर, त्यांना मोबाईलवर परतावा मिळाल्याचे बनावट संदेश येत होते. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात कधीच जमा झाली नाही. जेव्हा वकिलांनी मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना तांत्रिक अडचणी सांगण्यात आल्या. संशय आल्यावर त्यांनी चोरट्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, तो बंद असल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
सायबर पोलिसांचा तपास सुरू
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. सुशिक्षित आणि कायदेतज्ज्ञ असलेल्या व्यक्तीची अशा प्रकारे फसवणूक झाल्याने "उच्चशिक्षित पुणेकर हव्यासापोटी सायबर जाळ्यात का अडकतात?" असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Fraud: हे तुमच्यासोबतही घडू शकतं; उच्चशिक्षित पुणेकर नेमकं कसं गंडतायेत? आणखी एका वकिलाला 14 कोटीचा गंडा, असा असतो 'मास्टरप्लॅन'
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement