Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; मेट्रो 508 मीटर लांबीचा फूट-ओव्हर-ब्रिज उभारणार

Last Updated:

Pune Chandani Chowkk Foot Over Bridge: पुणे मेट्रो प्रकल्पाने बेंगळुरू- मुंबई राष्ट्रीय महामार्ग बायपासवरील चांदणी चौक मेट्रो स्थानकाजवळ 508 मीटर लांबीचा फूट-ओव्हर-ब्रिज (FOB) बांधण्यात येणार आहे.

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; मेट्रो 508 मीटर लांबीचा फूट-ओव्हर-ब्रिज उभारणार
Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; मेट्रो 508 मीटर लांबीचा फूट-ओव्हर-ब्रिज उभारणार
पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यामध्ये आता दिवसेंदिवस मेट्रोचं जाळं अधिकच विस्तीर्ण होत आहे. मेट्रोमुळे पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका झाली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाने बेंगळुरू- मुंबई राष्ट्रीय महामार्ग बायपासवरील चांदणी चौक मेट्रो स्थानकाजवळ 508 मीटर लांबीचा फूट-ओव्हर-ब्रिज (FOB) बांधण्यात येणार आहे. हा उपक्रम पुणे मेट्रो लाईन 2 वनाज ते चांदणी चौक मार्गाच्या आगामी विस्ताराचा एक भाग आहे, ज्यामध्ये कोथरूड जवळ एक डेपो आणि चांदणी चौक येथे एक स्टेशन देखील असणार आहे.
मुंबई- बंगळुरु बायपासवरील चांदणी चौकामध्ये नेहमीच वर्दळ असते. इथे अनेक मार्गावरुन येणारे प्रवासी पुण्यामध्ये जातात. तसेच पुण्याबाहेर जाण्यासाठीही याच चांदणी चौकावरील बायपास रस्त्याचा वापर करतात. त्यामुळेच आता हा ओव्हरब्रीज बांधण्यात येणार आहे. पुणे शहर आणि जवळच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये जसे की हिंजवडी, चाकण आणि पिरंगुट येथे जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठी एक प्रमुख ट्रान्झिट कॉरिडॉर म्हणून काम करतो. या राष्ट्रीय महामार्ग जंक्शनवरून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या लोकांसाठी पादचाऱ्यांसाठी प्रवेश आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी या ओव्हरब्रीजची रचना करण्यात आली आहे.
advertisement
मेट्रो लाइन 2 मध्ये वनाज ते चांदणी चौक हा मार्ग 1123 मीटरपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामध्ये कोथरुड डेपो आणि चांदणी चौक ही स्थानके आहेत. आता चांदणी चौकातून राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना सहज प्रवास करता यावा, यासाठी हा ओव्हरब्रीज बांधण्यात येणार आहे. हा मेट्रो फूटओव्हर ब्रिज चांदणी चौक येथील राष्ट्रीय महामार्गावरच्या (NHAI) फूटओव्हर ब्रिजसोबत जोडला जाईल. जेणेकरुन नागरिकांना थेट राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करता येईल. आता नागरिकांना मेट्रोच्या विरुद्ध बाजूने रस्ता ओलांडता येणार आहे. त्याचसोबत चांदणी चौक मेट्रो स्टेशनवर पोहचण्यासाठी हा फुटओव्हर ब्रिज वापरता येईल.
advertisement
वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पुणे मेट्रो हा फुट वेअर ब्रिज तयार करत आहे. याचसोबत कर्वे रोडवरील आणि कोथरुड डेपोमध्ये डबल डेकर पूल बांधण्यासाठीही सुरुवात करण्यात आली आहे. कोथरुड डेपो आणि चांदणी चौक यादरम्यान अजून दोन स्थानके आहेत. सरकारने वनाझ ते चांदणी चौक हा मार्ग वाढवण्यास परवानगी दिली होती. यानंतर मात्र, चांदणी चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होईल, असं लक्षात आलं. त्यामुळेच नागरिकांसाठी हा 508 मीटर लांबीचा फूट ओव्हरब्रिज बांधण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; मेट्रो 508 मीटर लांबीचा फूट-ओव्हर-ब्रिज उभारणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement