Pune News : मित्रासोबत फिरायला गेलेली रिदा परतलीच नाही; हिंजवडीत तरुणीसोबत भयंकर घडलं

Last Updated:

कासारसाई धरणावर पर्यटन करून ती घरी परतत होती. मात्र, वाटेतच असं काही घडलं, की ती घरापर्यंत पोहोचलीच नाही

अपघातात मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
अपघातात मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्याच्या विमाननगर येथे राहणारी रिदा इमरान खान ही तरुणी आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. कासारसाई धरणावर पर्यटन करून ती घरी परतत होती. मात्र, वाटेतच असं काही घडलं, की ती घरापर्यंत पोहोचलीच नाही. रिदा ज्या तरुणासोबत फिरायला गेली होती, त्या महाविद्यालयीन तरुणाच्या दुचाकीला भरधाव वेगातील मिक्सरने धडक दिली. त्यात तरुणीचा मृत्यू झाला.
या घटनेत दुचाकीवरील तरुणही गंभीर जखमी झाला. मारुंजीतील शिंदेवस्ती इथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. हिंजवडी आयटी परिसरात मिक्सरने धडक देऊन झालेल्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. अपघातानंतर यावेळी जमलेल्या नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच रिदाचा मृत्यू झाला. तर विवेक ठाकूर गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
advertisement
कासारसाई धरणावर पर्यटन करून घरी येत असताना ही घटना घडली. विवेक ठाकूर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर मिक्सर चालक अजमल अख्तर अन्सारी याला अटक केली आहे.
हिंजवडी पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, रिदा आणि विवेक हे मित्र आहेत. पुण्यातील फोर साइड कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयातील बीसीए पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी दोघेही कासारसाई धरण भागात दुचाकीने फिरण्यासाठी गेले होते. शुक्रवारी दुपारी ते दुचाकीवरून विमाननगरला परतत होते. मात्र, मारुंजीतील शिंदेवस्ती येथे मिक्सरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रिदा आणि विवेक ठाकूर गंभीर जखमी झाले आणि रिदाचा मृत्यू झाला.
advertisement
मिक्सर चालक अजमल अख्तर अन्सारी याला अटक केली आहे. त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान आयटी परिसरामध्ये डंपरचालक वेगाने वाहने चालवतात. चालकांकडून नियमांचे उल्लघंन होतं. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यासोबतच नियम मोडणाऱ्या डंपरचालकांवर पोलिसांनी कारावई करावी, अशी मागणीही नागरिक करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : मित्रासोबत फिरायला गेलेली रिदा परतलीच नाही; हिंजवडीत तरुणीसोबत भयंकर घडलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement