Pune : अजित पवारांच्या जिल्हयात सर्वाधिक लाडक्या बहिणींची बोगस लाभार्थी, प्रश्न विचारताच दादांचा काढता पाय, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे.
Ajit Pawar Statement In Pune : 'मुख्यमंत्री-माझी लाडकी चहीण' योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्हयात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले. त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र 'लाडक्या बहिणी' ची पुन्हा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
...मग योजना बंद करू का? - अजित पवार
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी मिळून आले आहेत. या विषयावर आज पुण्यात अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी थेट भूमिका न जाहीर करता "...मग योजना बंद करू का?" अशी प्रतिक्रिया दिली. पुण्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी उत्तर दिलं.
advertisement
उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक लाडक्या बहिणींची बोगस लाभार्थी, प्रश्न विचारताच दादांचा काढता पाय pic.twitter.com/aCUC3CvgqZ
— News18Lokmat (@News18lokmat) August 24, 2025
26 लाख 34 हजार माहिला अपात्र
महिती आणि तंत्रज्ञान विभागाने लाडकी बहीण योजनेतील 26 लाख 34 हजार माहिलांनी अपात्र असतानाही सरकारची फसवणूक करून या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक बाब सरकारच्या निदर्शनास आणली होती. यामध्ये सरकारच्या एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेणे, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक व्यक्तीनी योजनेचा लाभ घेतलाय.
advertisement
ई-केवायसी पडताळणी करण्याचा निर्णय
दरम्यान, या योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याची उदाहरणे समोर येत असल्यामुळे सर्व पात्र लाभार्थीची ई-केवायसी पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार लाभार्थींना आपली सर्व माहिती द्यावी लागणार आहे. ही मोहीम लवकरच सुरू होणार आहे. तपासणी करूनच पुढील लाभ दिला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 24, 2025 11:08 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : अजित पवारांच्या जिल्हयात सर्वाधिक लाडक्या बहिणींची बोगस लाभार्थी, प्रश्न विचारताच दादांचा काढता पाय, पाहा Video