पुण्यात तब्बल दोन वर्षापासून वीज चोरी, रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने करायचे चोरी, MSEB ने ठोठावला 19 लाखांचा दंड

Last Updated:

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भोसरी एमआयडीसीमध्ये रिमोट कंट्रोलच्या मदतीने गेल्या अनेक वर्षापासून वीज चोरी सूरू होती.

pimpari chinchwad
pimpari chinchwad
Pimpari Chinchwad News : विश्वनाथ सावंत, नवी मुंबई :  पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भोसरी एमआयडीसीमध्ये रिमोट कंट्रोलच्या मदतीने गेल्या अनेक वर्षापासून वीज चोरी सूरू होती. आज अखेर महावितरणने धाड टाकून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली तब्बल 19 लाखांची वीजचोरी महावितरणने उघड केली आहे. यावेळी महावितरणाने कंपनीला 19 लाखांचा दंडही ठोठावला आणि वीज चोरीचं साहित्यही जप्त केलं. या घटनेची आता एकच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीमधील गणेश प्रेसिंग कंपनी ही रिमोट कंट्रोलच्या मदतीने वीज चोरी करत असल्याचा माहिती महावितरणाला मिळाली होती. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी वीज वितरण हाणी कमी करण्याबाबत श्रेत्रिय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.त्यानुसार महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी वीजचोरी विरोधात मोहिम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
advertisement
गणेशखिंड मंडलाचे अधिक्षत अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी खास पथक तयार केले होते. या पथकात अतिरीक्त कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड, महेश वाघमारे यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये तपासणी सूरू केली.
या तपासणीत गणेश प्रेसिंग या कंपनीकडून 77,270 युनिट्सची वीजचोरी झाल्याचं समोर आलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून ही कंपनी रिमोट कंट्रोलच्या मदतीने वीजचोरी करत होती. या कंपनीने तब्बल 19 लाखांची वीजचोरी करत असल्याचे महावितरणने उघड केली होते.
advertisement
महावितरणने या ग्राहकाकडून चोरी केलेल्या विजेची रक्कम म्हणून 19 लाख 19 हजार 362 आणि तडजोड शुल्क म्हणून 2 लाख 30 हजार असा एकूण दंड वसूल केला आहे.तसेच कंपनीकडून औद्योगिक ग्राहकाकडून वीजचोरीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात तब्बल दोन वर्षापासून वीज चोरी, रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने करायचे चोरी, MSEB ने ठोठावला 19 लाखांचा दंड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement