Pune: 17 ते 28 जूनदरम्यान ब्लॉकमुळे रेल्वे रद्द, कोणत्या गाड्यांवर परिणाम? एका क्लिकवर!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
बदललेल्या वेळापत्रकामुळे रेल्वे प्रवासी, मालवाहतूक व्यापारी, व्यापारी, वाहतूकदार, कामगार, कर्मचारी आणि विद्यार्थी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागाच्या पुणतांबा आणि कान्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचं काम सुरू करण्यासाठी ट्रॅफिक आणि पॉव्हर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कामासाठी 17 ते 28 जूनदरम्यान काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी-पुणे रेल्वे 19 आणि 26 जून रोजी, पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी स्पेशल रेल्वे 20 आणि 27 जून रोजी, नांदेड-हडपसर स्पेशल रेल्वे 19 जून रोजी, हडपसर-नांदेड स्पेशल रेल्वे 20 जून रोजी, जबलपूर-पुणे रेल्वे 23 जून रोजी, पुणे-जबलपूर स्पेशल रेल्वे 24 जून रोजी आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस 29 आणि 30 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.
advertisement
या बदललेल्या वेळापत्रकामुळे रेल्वे प्रवासी, मालवाहतूक व्यापारी, व्यापारी, वाहतूकदार, कामगार, कर्मचारी आणि विद्यार्थी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.
दरम्यान, नांदेडसह एकूणच मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं गाडी क्रमांक 12730/12729 या द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसची वारंवारता वाढवून दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला होता. या गाडीचा क्रमांक 17630/17629 असा बदलण्यात आला. नांदेड-हडपसर आणि हडपसर-नांदेड अशी ही गाडी थेट पुण्यापर्यंत धावू लागली होती. त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळाला. परंतु आता ब्लॉककाळात बदललेल्या वेळापत्रकाचा या एक्स्प्रेसवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 19, 2024 10:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: 17 ते 28 जूनदरम्यान ब्लॉकमुळे रेल्वे रद्द, कोणत्या गाड्यांवर परिणाम? एका क्लिकवर!