Pune News: पुणेकरांचा जमिनीखालून सुसाट प्रवास! येरवडा-कात्रज भुयारी मार्गाचा प्लॅन बदलला, आता हे मार्गही जोडणार?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शहराच्या उत्तर-दक्षिण भागाला जोडणाऱ्या येरवडा ते कात्रज या ५४ किलोमीटरच्या प्रस्तावित भुयारी मार्गाच्या आराखड्यात आता मोठे बदल करण्यात येत आहेत.
पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) कंबर कसली आहे. शहराच्या उत्तर-दक्षिण भागाला जोडणाऱ्या येरवडा ते कात्रज या ५४ किलोमीटरच्या प्रस्तावित भुयारी मार्गाच्या आराखड्यात आता मोठे बदल करण्यात येत आहेत. केवळ एकाच मार्गावर लक्ष केंद्रित न करता, शहराच्या पूर्व-पश्चिम भागांतील महत्त्वाचे रस्ते या प्रकल्पाला जोडण्यासाठी पीएमआरडीएने चाचपणी सुरू केली आहे.
३२ हजार कोटींचा प्रकल्प
नुकतीच विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पुटा) आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ३२ हजार कोटी रुपयांच्या या महाकाय प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पाची व्यवहार्यता तपासल्याशिवाय आणि विविध पर्यायांचे रेटिंग निश्चित केल्याशिवाय या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर (DPR) अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
नेमके काय बदल होणार?
एक्झिट पॉइंट्सवर लक्ष: भुयारी मार्गातून बाहेर पडणारी वाहतूक पुन्हा मुख्य रस्त्यांवर कोंडी निर्माण करणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
नवे मार्ग: केवळ येरवडा-कात्रज न ठेवता, शहराच्या गरजेनुसार ६ ते ७ वेगवेगळ्या उप-मार्गांचा अभ्यास केला जात आहे.
पार्किंगशी सांगड: महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी या प्रकल्पाची शहराच्या पार्किंग धोरणाशी सांगड घालण्याची गरज व्यक्त केली आहे.
advertisement
विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले की, कोणताही मार्ग निश्चित करण्यापूर्वी नागरिकांच्या प्रवासाची पद्धत आणि दिशा यांचा सखोल अभ्यास केला जाईल. हा प्रकल्प पुणेकरांसाठी खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरावा, यासाठी पीएमआरडीए सखोल अभ्यास करत आहे.
पुणे शहराच्या पोटातून धावणाऱ्या या ५४ किमीच्या भुयारी मार्ग प्रकल्पामुळे पुणेकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळेची प्रचंड बचत; येरवडा ते कात्रज हे अंतर कापण्यासाठी सध्या लागणारा दीड ते दोन तासांचा वेळ केवळ २० ते २५ मिनिटांवर येण्याची शक्यता आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील ६० ते ७० टक्के वाहतूक जमिनीखाली वळवल्यामुळे वरच्या स्तरावरील सिग्नलची कोंडी फुटण्यास मदत होईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 10:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांचा जमिनीखालून सुसाट प्रवास! येरवडा-कात्रज भुयारी मार्गाचा प्लॅन बदलला, आता हे मार्गही जोडणार?








