Pune Crime : निलेश घायवळ पुण्यात फक्त गुंडगिरी करत नव्हता, काळे कारनामे समोर! पुणे पोलिसांनी ED कडून लावला ट्रॅप

Last Updated:

Pune Crime News Police Letter : निलेश घायवळच्या प्रकरणाच्या तपासातून मोठा मनी लॉड्रिंगचा (money laundering) प्रकार उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

Pune police Pens letter to ED to Investigate Nilesh Ghaiwal
Pune police Pens letter to ED to Investigate Nilesh Ghaiwal
Pune Nilesh Ghaiwal Crime : पुण्यातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांवर पुणे पोलिसांची (Pune Police) गुन्हे शाखा बारकाईने नजर ठेवून आहे. अशाच एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या आर्थिक व्यवहारांच्या सखोल चौकशीसाठी आता विशेष केंद्रीय संस्थेची मदत घेण्यात येत आहे. गुन्हेगारीतून कमावलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा स्त्रोत आणि त्यावर आधारित मनी लॉड्रिंगचे (money laundering) मोठे रॅकेट उघड करणं हा या मागील एकमेव उद्देश आहे. अशातच आता निलेश घायवळला मोठा धक्का बसला आहे.

संशयास्पद संपत्ती जमा केली? 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी टोळीप्रमुख नीलेश घायवळ याच्या संशयास्पद आर्थिक उलाढालींचा तपास करण्यासाठी अंमलजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीला पत्र पाठवून औपचारिक विनंती केली आहे. घायवळविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, याच गुन्ह्यांतून त्याने मोठी आणि संशयास्पद संपत्ती जमा केली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे.
advertisement

आर्थिक उलाढालीचे ठोस पुरावे हाती

पोलिसांच्या नोंदीनुसार, नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच मालमत्ता बळकावण्यासाठी दुखापत पोहोचवणे अशा अनेक गंभीर आरोपांचा समावेश आहे. तपासादरम्यान पोलिसांना घायवळच्या प्रचंड मोठ्या आर्थिक उलाढालीचे ठोस पुरावे हाती लागले आहेत. या टोळीने धाराशिव, अहिल्यानगर, बीड आणि सातारा यांसारख्या परिसरांमध्ये विंड पॉवर प्रकल्पांशी संबंधित गैरव्यवहार, खंडणी आणि इतर बेकायदेशीर मार्गांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा पोलिसांना संशय आहे.
advertisement

बेकायदेशीर मार्गाने पासपोर्ट

पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांसंदर्भातील एफआयआर आणि आवश्यक पुरावे ईडीकडे सोपवले आहेत. यामुळे या प्रकरणाच्या तपासातून मोठा मनी लॉड्रिंगचा (money laundering) प्रकार उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या घायवळने बेकायदेशीर मार्गाने पासपोर्ट मिळवल्याचेही समोर आले असून, तो सध्या परदेशात असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : निलेश घायवळ पुण्यात फक्त गुंडगिरी करत नव्हता, काळे कारनामे समोर! पुणे पोलिसांनी ED कडून लावला ट्रॅप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement