आंदेकर टोळीला आणखी एक दणका, पुणे पोलिसांनी घेतली ॲक्शन

Last Updated:

पुण्यात गँगवॉरमधून घडलेल्या दोन हत्येनंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीविरोधात मोठी ॲक्शन घेतली आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: मागील काही दिवसांपासून पुण्यात गँगवॉरच्या घटना घडत आहेत. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मागील वर्षी खून झाला होता. या खुनानंतर आंदेकर टोळी आक्रमक झाली आहे. त्यांनी वनराज आंदेकर यांना मारणाऱ्या आरोपींच्या कुटुंबीयांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठेत आयुष कोमकरची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
आयुष हा वनराज खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता. या हत्येनंतर काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीने वनराजच्या हत्येतील आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळेची हत्या केली. त्याच्यावर नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर कोयत्याने वार करून जीव घेण्यात आला. या दोन गँगवॉरच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीविरोधात मोठी अॅक्शन घेतली आहे.
advertisement
यापूर्वी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरची अनधिकृत बांधकामं पाडली होती. त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्याचं काम केलं होतं. आता पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीला अजून एक दणका दिला आहे. पुण्यात आंदेकर टोळीने अनधिकृतपणे बांधलेलं वारकरी भवन पडण्यास सुरूवात केली आहे. आंदेकर टोळी पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या कारवाईला सुरुवात झाली आहे.
advertisement
गणेश काळेच्या हत्येचं प्लॅनिंग तुरुंगात केल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकरला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. याचवेळी गणेश काळेच्या मारेकऱ्यांनी कृष्णाची भेट घेतली होती. याच भेटीत कृष्णाने गणेशच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अशात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीने बांधलेल्या अनधिकृती वारकरी भवनावर देखील हातोडा चालवला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आंदेकर टोळीला आणखी एक दणका, पुणे पोलिसांनी घेतली ॲक्शन
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement