Pune Traffic : पुणे मुंबई प्रवास करायचा सुस्साट तर वापरा हा 'मास्टर प्लॅन, अजिबात मिळणार नाही ट्रॅफिक जॅम
Last Updated:
Pune Traffic Latest News : दिवाळीनंतर पुण्याकडे नागरिक परतत असल्याने महामार्गांवर मोठी वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहनचालकांना गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
पुणे : दिवाळीचा सण संपल्यानंतर आता नागरिक आपल्या कामाच्या ठिकाणी, शिक्षणासाठी तसेच व्यवसायासाठी पुन्हा पुणे आणि मुंबईकडे परतत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महामार्गांवर मोठी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महामार्ग पोलिसांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
'या' दिवसात वाहतूक कोंडीची शक्यता
24 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत पुणे-मुंबई महामार्ग, सोलापूर-पुणे रस्ता, नाशिक-पुणे मार्ग आणि कोल्हापूर-मुंबई रस्ता या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अनेकजण आपल्या गावी सण साजरा करून आता शहरांकडे परतत आहेत. त्यामुळे खासगी गाड्या, मोटारी आणि खासगी बस मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्या आहेत. या वाढलेल्या वाहतुकीमुळे महामार्गांवर गर्दी वाढणार असून काही ठिकाणी कोंडीही होऊ शकते.
advertisement
सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्याचा उपाय
महामार्ग पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त हिंमत जाधव आणि पिंपरी-चिंचवडचे उपायुक्त विवेक पाटील यांनी नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. नागरिकांनी शक्यतो खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच एस.टी. बस, रेल्वे किंवा अन्य सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे महामार्गावरील ताण कमी होईल आणि प्रवासही सुरक्षित राहील.
advertisement
कोणत्या वेळेत प्रवास करणे सोयीस्कर ठरेल
महामार्गावर सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत सर्वाधिक वाहतूक होते. त्यामुळे या वेळेत प्रवास टाळल्यास कोंडी टाळता येईल. तसेच प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा. चाकण, देहूरोड, कात्रज घाट, तसेच लोणावळा परिसरात वाहतुकीचा वेग संथ होण्याची शक्यता आहे.
advertisement
वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, ओव्हरटेक करताना काळजी घ्यावी, वाहनांमध्ये योग्य अंतर राखावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही पोलिसांनी सांगितले आहे. गर्दीमुळे अपघात होऊ नयेत, म्हणून वाहनचालकांनी संयम बाळगावा आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 25, 2025 8:42 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic : पुणे मुंबई प्रवास करायचा सुस्साट तर वापरा हा 'मास्टर प्लॅन, अजिबात मिळणार नाही ट्रॅफिक जॅम








