पोर्शे प्रकरणातील कारवाईला वेग दादांच्या पुण्यात फडणवीस हालवतायेत सूत्रं

Last Updated:

फडणवीसांनी पुणे गाठत अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. यंत्रणेला कामाला लावलं. यानंतर तपासाला अधिक वेग आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुखांना अटक केली.

News18
News18
राहुल झोरी, प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण नवनवे वळण घेतो आहे. या घटनेच्या तपासाला गती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होतायेत. या प्रकरणाला दडपलं जात असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते. गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती. विरोधक तथ्य वेगळ्या पद्धतीने मांडत असल्याचं बोललं गेलं. फडणवीसांनी पुणे गाठत अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. यंत्रणेला कामाला लावलं. यानंतर तपासाला अधिक वेग आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुखांना अटक केली.
दोन डॉक्टरांना mumअटक
सोबतच दोन डॉक्टरांनाही तुरुंगवास झाला आहे. अल्पवयीन आरोपीच्या मद्ययुक्त रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप या डॉक्टरांवर आहे. सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी प्रथम ससून रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी, त्याच्या रक्ताचा नमुना बदलून दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला, ज्यामुळे अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोलची पुष्टी करण्यात आली नव्हती. म्हणजे हा अपघात दारुच्या नशेत झाला नाही असं सिद्ध करण्याचा हा प्रयत्न होता. या दरम्यान दुसऱ्या रक्त नमुन्यात अल्कोहोल असल्याची पुष्टी झाली. संशयाच्या आधारे पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुखासह दोन डॉक्टरांना अटक केली आहे.
advertisement
पुराव्यांना कमजोर करण्याचं प्रयत्न
धनाढ्य बिल्डरचा मुलगा वेदांत अग्रवाल सध्या अटकेत आहे. पैशाचा वापर करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो असल्याचं दिसून आलं. आरोपी मुलाने मद्यप्राशन केलेच नव्हते, अशा आशयाने पुरावे बदलले जात आहेत. यादरम्यान १९ मेला सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी या कटात सहभाग घेतला. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यात छेडछाड करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबितही करण्यात आलं होतं. पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांचे मोबाईलही जप्त केले आहेत. अपघाताच्या दिवशी डॉ.अजय तवरे आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात फोनवरून संभाषण झालं, ही बाब पोलीस तपासात समोर आली आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलले होते.
advertisement
असा रचला कट
आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी डॉक्टरांनी ही या कटात सहभाग रचला. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी पैशाचे आमिष दाखवलं. डॉक्टरांकडून आपल्या सोईचे रिपोर्ट बनवून घेतले होते. डॉ अजय तावरे हे ससून हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजीचे प्रमुख आहेत. दुसरे डॉक्टर डॉ श्रीहरी हरलोल हे आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. श्रीहरी हरलोळ यांनी रक्ताचा नमुना घेतला होता, गुन्हा लपविण्यासाठी रजेवर असलेले डॉ.अजय तवरे यांनी दुसऱ्या रुग्णाच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी दिला. परंतु पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना डीएनए चाचणीसाठी दुसऱ्या लेबलवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
कल्याणीनगर अपघात
१९ मेच्या मध्यरात्री पुणे एका अपघाताने हदरलं. या दिवशी १२ ची निकाल लागला होता. याचा उत्साह साजरा करण्यासाठी काही मुलं मध्यपान करण्यास गेले होते. यात कल्याणीनगर भागातील रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षीय मुलगा ही होता. मध्यपान केल्यानंतर त्याने पोर्शे गाडी चालवली. भरधाव वेगात म्हणजे प्रत्यक्षदर्शींच्या शब्दात २०० किमी प्रतितास पोर्शे कारचा वेग होता. इतक्या वेगात आरोपीने दुचाकीला धडक दिली. यात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जमावाने आरोपीला मारहाण केली. हिट अँड रनच्या या प्रकरणात आरोपीला अटक झाली. बाल गुन्हेगार मंडळाने १४ तासांनंतर अल्पवयीन आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी दारूच्या नशेत सुसाट वेगाने कार चालवत होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झालं. सध्या आरोपी बालसुधारणागृहात आहे.
advertisement
दादांच्या पुण्यात फडणवीसांचा पुढाकार
या गंभीर अपघातानंतर आरोपीला बाल गुन्हेगार बोर्डाने आरोपीला किरकोळ शिक्षा सुनावली होती. ३०० शब्दांचा निबंध लिहणे, ट्राफिक पोलिसांना मदत करणे वैगेरे शिक्षा होत्या. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला. आरोपीचे वय १७ वर्षे ८ महिने आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी आरोपीचं बालवयीन असण्याकडे दुर्लक्ष करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मृत अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयाच्या बाजूने ते उभे राहिले. अजित पवार पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, अजित पवारांनी पुढं येवून हे प्रकरण हाताळलं नसल्याचं बोललं गेलं. या उलट फडणवीसांनी सुत्रं हाती घेतली. बाल गुन्हे मंडळाची शिक्षा रद्द केली. नव्याने गुन्हे दाखल करायला लावले.
advertisement
तपासात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. आता डॉक्टराचे निलंबन झालं आहे. शिवाय आरोपीचे आजोबांवरील आरोपांच्या जुन्या फाईल्स उघडण्यात आल्यात. विशाल आग्रवल या आरोपींच्या वडीलांना अटक झालीये. त्यामुळं दादांच्या पुण्यात फढणवीसांनी सुत्रं हातात घेतल्याचं बोललं जातंय.
मराठी बातम्या/पुणे/
पोर्शे प्रकरणातील कारवाईला वेग दादांच्या पुण्यात फडणवीस हालवतायेत सूत्रं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement