सोळाव्या वर्षापासून हमाली केली, आई-वडिलांच्या नावे संस्था उभारली, आता करतायेत मोठं काम, तुम्हीही कराल सलाम!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Inspiring Story: पुणेकर रिक्षा चालकाचे काम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आई-वडिलांच्या नावे एक संस्था उभारून ते दिव्यांग, गरजूंना मदत करत आहेत.
पुणे: काही व्यक्ती आयुष्यात आलेल्या संघर्षांवर मात करून स्वतःचं जीवन घडवतात आणि त्या अनुभवांमधून इतरांसाठीही आशेचा किरण बनतात. पुण्यातील असंच एक नाव म्हणजे नितीन शिंदे होय. गेल्या 34 वर्षांपासून रिक्षा चालवत आयुष्याच्या खडतर वाटा पार केलेल्या शिंदे यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि ‘मधुतारा दिव्यांग सोशल फाउंडेशन’ची स्थापना केली. आज ही संस्था पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील गरजू, दिव्यांग, निराधार व महिलांसाठी आधार बनण्याचं काम करतेय. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
नितीन शिंदे यांनी वडील मधुकर आणि आई ताराबाई यांच्या नावावरून 20222 साली ‘मधुतारा फाउंडेशन’ स्थापन केले. या फाउंडेशनने अल्पावधीत समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य सुरू केलं आहे. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, दिव्यांगांसाठी सहाय्य, रोजगार उपलब्ध करून देणं यासारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेली ही संस्था सध्या पुण्यातील 450 हून अधिक सामाजिक संस्थांशी जोडली गेली आहे.
advertisement
हमाल झाला समाजसेवक
नितीन शिंदे यांनी वयाच्या 16 व्या वर्षी हमालीचं काम सुरू केलं. नंतर वयाच्या 21 व्या वर्षी स्वतःची रिक्षा घेतली. सुरुवातीला जीवन जगण्यासाठी संघर्षच होता. पण बहिणीच्या आजारपणाचा अनुभव घेतल्यानंतर समजलं की गरजू लोकांसाठी योग्य मार्गदर्शन आणि मदतीची नितांत गरज आहे. त्यातूनच 'मधुतारा'ची संकल्पना जन्माला आली, असं शिंदे सांगतात.
advertisement
दिव्यांगांना आधार
फाउंडेशनच्या माध्यमातून शेकडो दिव्यांगांना व्हीलचेअर, वॉकर, स्टिक, कमोड चेअर्स यांचं वाटप करण्यात आलं आहे. तसेच हात किंवा पाय नसलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवून देण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ व ‘आयुष्मान भारत’ यासारख्या शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून, मोफत उपचार मिळवून देण्याचं काम या संस्थेद्वारे केलं जातं. अशा उपचारांसाठी योग्य कागदपत्रांची पूर्तता, रुग्णालयांशी समन्वय यांसाठीही संस्था कार्य करते.
advertisement
शिक्षणासाठी सहकार्य
view commentsशिक्षण अर्धवट राहिलेल्या मुलींना बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी आर्थिक व शैक्षणिक मदत दिली जाते. विधवा महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मार्गदर्शन आणि स्वरोजगारासाठी संस्थेकडून साहाय्य दिलं जातं. स्वतःची रिक्षा चालवत मिळवलेली कमाई आणि समाजातील काही संवेदनशील व्यक्तींचा पाठिंबा याच्या जोरावर ते हे कार्य पुढे नेत आहेत, अशी माहिती नितीन शिंदे यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 23, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सोळाव्या वर्षापासून हमाली केली, आई-वडिलांच्या नावे संस्था उभारली, आता करतायेत मोठं काम, तुम्हीही कराल सलाम!

