Sharad Mohol murder : शरद मोहोळ हत्या प्रकरणाला नवं वळण, गेम वाजवणाऱ्या मुन्ना पोळेकरबद्दल नवी माहितीसमोर
- Published by:sachin Salve
Last Updated:
Sharad Mohol murder case :सोबत राहूनच त्याने शरद मोहोळच्या हालचालींची माहिती मामा नामदेव कानगुडे याला दिली. आठवडाभरापूर्वी शरद मोहोळचा गेम करायचं निश्चित झालं.
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची भरदिवसा हत्या झाल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली. ज्या दिवशी त्याची हत्या झाली त्या दिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. पण, त्याच्याच साथीदारांनी जमीन आणि वर्चस्वाच्या वादातून त्याची हत्या केली. या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे.
नामदेव कानगुडे हा या हत्येचा खरा मास्टरमाईंड असून त्याने मोहोळच्या हत्येचा कट रचला. मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्ववादातून शरद मोहोळ याची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मुन्ना पोळेकर याच्यासह दोन जणांना मोहोळच्या टोळीत महिनाभर आधी घुसवण्यात आलं, त्यानंतर ही हत्या करण्यात आली आहे.
advertisement
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र केवळ 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना शुक्रवारी रात्री पुणे पोलिसांनी अटक केली होती. एकूण 8 आरोपींपैकी 2 आरोपी वकील असून यांच्याकडून आज कोर्टात जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला. या सहा आरोपींच वकीलपत्र आम्ही घेतल्यामुळे आम्हाला अटक करण्यात आल्याचं संबंधित वकिलांचा म्हणणं आहे.
advertisement
2009 पासून पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात एक नवीन नाव समोर आलं ते शरद मोहोळच. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण खंडणी अशा कित्येक गुन्ह्याची शरद मोहोळ च्या नावे नोंद झाली. 2009 ला चुलत भाऊ संदीप मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पहिल्यांदा शरद मोहोळने किशोर उर्फ पिंट्या मारणेचा नीलायम टॅाकिज जवळ खून केला. त्यानंतर तुरूंगात जाऊन आल्यावर पुन्हा त्याच नाव चर्चेत आल ते दासवे गावच्या सरपंचाच अपहरण केल्याच्या प्रकरणात. पुन्हा त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली. येरवडा कारागृहात जर्मन बेकरी स्फोटाचा संशयित दहशतवादी मोहम्मद कातिल सिद्दिकी याचा गळा आवळून खून केला. तिथून शरद मोहोळ राष्ट्रीय पातळींवर पोहोचला. या खुनाचं भांडवल करत त्याने स्वताची प्रतिमा छोटा राजन च्या धर्तीवर हिंदू डॅान अशी निर्माण केली. सिद्दीकीच्या खूनातून निर्दोष सुटल्यावर किशोर मारणेच्या खूनप्रकरणात मात्र त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. उच्च न्यायालयात गेल्यावर त्याला या प्रकरणी जामीन मिळाला. त्यानंतर मात्र त्याने राजकारणाकडे मोर्चा वळवला. पत्नीला भाजपमध्ये प्रवेश घेऊन पदाधिकारी करून तिला नगरसेविका करण्याची मोर्चेबांधणी त्याने सुरू केली.
advertisement
गेल्या 15 वर्षांत शरद मोहोळने गुन्हेगारी जगतात नाव कमावल तसे शत्रू ही वाढवले. तो राहत असलेल्या कोथरूडच्या सुतारदरा परिसरात राहणाऱ्या नामदेव कानगुडेला त्याने सुतारदरा सोडायला भाग पाडलं. त्याच कानगुडेने ओळख असल्याचा फायदा घेत भाचा मुन्ना पोळेकर याला शरद मोहोळकडे टोळीत विश्वास संपादन करायला पाठवलं. 3 महिन्यापूर्वीच या हत्येसाठी मुन्ना पोळेकरने 3 देशी बनावटीची पिस्टल आणली होती. गेल्या महिनाभर तो शरद मोहोळकडे सतत ये जा करत होता. गेला आठवडाभर तर तो बॅाडीगार्ड म्हणून मोहोळच्या सोबत फिरत होता.
advertisement
सोबत राहूनच त्याने शरद मोहोळच्या हालचालींची माहिती मामा नामदेव कानगुडे याला दिली. आठवडाभरापूर्वी शरद मोहोळचा गेम करायचं निश्चित झालं. शुक्रवारी दुपारी जेवण करताना ही सोबत असलेल्या मुन्ना पोळेकरने मोहोळ दगडूशेठला पत्नीला घेऊन जाणार असल्याची माहिती देऊन आधीच शंकर गंडले आणि अमित कानगुडे या साथीदारांना रस्त्यात येऊन थांबायला सांगितलं होतं. बरोबर रस्त्यात असलेल्या सीसीटीव्हीचा अंदाज घेऊन मागून चालणाऱ्या मुन्ना पोळेकरने त्याच्या आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री करत अगदी दीड फुटांवरून पहिली गोळी झाडली. त्या धक्क्याने शरद मोहोळने मागे वळून पाहिल्यावर दुसरी गोळी झाडली. जी थेट मोहोळच्या छातीत घुसली. तोवर बाजूला थांबलेल्या शंकर गंडले आणि अमित कानगुडे यांनी ही गोळ्या झाडल्या. काहीतरी घडल्या हे लक्षात आल्यावर नेहमी शरद मोहोळच्या पुढे चालणाऱ्या त्याच्या विश्वासू पप्पू उतेकरने मागे वळून पाहिलं आणि गोळ्या झाडणार्यांवर झडप घालून शंकर गंडलेला पकडलं पण तोवर शरद मोहोळ खाली पडलेला बघून तो त्याच्याकडे धावला आणि तिन्ही हल्लेखोरांनी पळ काढला. सीसीटीव्हीत ही दृश्य स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी खुनाचं कारण स्पष्ट केलंय. पूर्व वैमनस्य.
advertisement
हत्या करून आरोपी रिक्षाने चांदणी चौकापर्यंत गेले आणि तिथून गाडी घेऊन आलेल्या नामदेव कानगुडेच्या मदतीने साताऱ्याच्या दिशेनं पळून गेले. तोवर सीसीटीव्हीचा माग काढणाऱ्या गुन्हे शाखेला आरोपी सातारा रस्त्यावर गेल्याची माहिती मिळाली. तिथे गाडी खेड शिवापूर टोलनाक्याच्या पुढे बाजूला लाऊन त्यांनी वकिलांना संपर्क केला. वकिलांना बोलवून घेऊन पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी आरोपीना तिथेच अटक केली. त्याच्याकडून 3 पिस्टल, मॅग्झीन आणि पाच जिवंत राऊंड जप्त केले. ठोकायच तर मोठ्या कुणालातरी या मुळशी पॅटर्न सिनेमातला डायलॅाग शरद मोहोळच्या हत्येचा महत्वाचा पैलू आहे. कारण सीसीटीव्हीच्या खाली हत्या करण्यापासून ते मोहोळ टोळीत दाखल होणं हे सगळं फक्त मोठा गुन्हेगार होण्याच्या उद्देशाने केलेला गुन्हा आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 06, 2024 7:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Sharad Mohol murder : शरद मोहोळ हत्या प्रकरणाला नवं वळण, गेम वाजवणाऱ्या मुन्ना पोळेकरबद्दल नवी माहितीसमोर








