Vallabhsheth Benke : शरद पवार यांना मोठा धक्का! खंद्दे समर्थक माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचं निधन
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Vallabhsheth Benke : शरद पवार यांचे खंद्दे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन.
जुन्नर, (रायचंद शिंदे, प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके (वय 74) यांचे अल्पशा आजाराने रविवार निधन झाले. त्यांच्या जाण्याने तालुक्यातील राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते.
बेनके यांचा अंत्यविधी सोमवार दिनांक 12 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता त्यांच्या गावी हिवरे बुद्रुक (ता.जुन्नर जिल्हा, पुणे) या ठिकाणी होईल अशी माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी आहे दिली. त्यापूर्वी सोमवारी सकाळी 9 ते 12 या वेळात नारायणगाव येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
advertisement

माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचा जन्म 23 जून 1950 रोजी हिवरे बुद्रुक या गावी झाला. शेती हा मूळ व्यवसाय होता. हे 1985 साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 1990 साली दुसऱ्यांदा ते आमदार झाले. त्यानंतर लागोपाठ दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला. मात्र 2004 व 2009 साली पुन्हा आमदार वल्लभ बेनके जुन्नर विधानसभेवर निवडून आले. किल्ले शिवनेरी परिसर विकासाचे शिलेदार मानले जातात.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ते खंदे समर्थक होते. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे वल्लभ शेठ बेनके यांचा दरारा संपूर्ण पुणे जिल्ह्यात होता. त्यांच्या जाण्याने निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार अतुल बेनके यांच्या कुटुंबामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बेनके यांच्या मागे पत्नी, 3 मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे. जुन्नरचे विध्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 12, 2024 12:03 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Vallabhsheth Benke : शरद पवार यांना मोठा धक्का! खंद्दे समर्थक माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचं निधन







