advertisement

शिरूर पोलीस हायअलर्टवर! दहिवडीतील गावकरी संतापले; आरोपी अक्षय मांजरेच्या घराला पोलीस छावणीचे स्वरूप

Last Updated:

दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या 'सिरियल किलर' प्रवृत्तीच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी दहिवडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

News18
News18
सचिन तोडकर, प्रतिनिधी
पुणे :  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील धक्कादायक वास्तव आणि आरोपीचा गुन्हेगारी इतिहास पाहता परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील एका 12 वर्षीय मुलाच्या हत्येने माणुसकीला काळिमा फासला आहे. अक्षय मांजरे नावाच्या नराधमाने लैंगिक अत्याचाराच्या हेतूने या अल्पवयीन मुलाचा बळी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या आरोपीने दीड वर्षापूर्वी अशाच प्रकारे एका 10 वर्षांच्या मुलाची हत्या केली होती. दोन वर्षांत दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या 'सिरियल किलर' प्रवृत्तीच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी दहिवडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
advertisement

चौकशीतून भयंकर सत्य बाहेर

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अक्षय मांजरे याने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून या 12 वर्षीय मुलाची हत्या केली. मुलाच्या बेपत्ता होण्यानंतर शोध घेतला असता, त्याचे प्रेत संशयास्पद स्थितीत आढळले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर अक्षय मांजरेचे नाव समोर आले आणि त्याच्या चौकशीतून हे भयंकर सत्य बाहेर आले.

गुन्हेगारी इतिहासाने पोलीसही चक्रावले

advertisement
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दीड वर्षापूर्वी याच दहिवडी परिसरात एका 10 वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती. त्या घटनेतही अक्षय मांजरेचाच सहभाग होता आणि तो गुन्हा देखील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातूनच घडला होता. एका गुन्ह्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तसाच अघोरी गुन्हा केल्याने, हा आरोपी समाजासाठी अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement

आरोपीच्या घराला पोलीस बंदोबस्त

या घटनेनंतर दहिवडी ग्रामपंचायतीने प्रशासनाला लेखी निवेदन देऊन आरोपीला कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या भावना तीव्र असून गावात तणावाचे वातावरण आहे. आरोपीच्या कृत्यामुळे संतप्त झालेल्या जमावाचा रोष लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून आरोपीच्या कुटुंबीयांना आणि घराला पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
शिरूर पोलीस हायअलर्टवर! दहिवडीतील गावकरी संतापले; आरोपी अक्षय मांजरेच्या घराला पोलीस छावणीचे स्वरूप
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement