पुणेकरांनो विकेंडला बिनधास्त करा फिरायचा प्लॅन; स्वारगेट- महाबळेश्वर मार्गावर नवी ‘ई शिवाई’ बससेवा सुरू
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
स्वारगेट ते महाबळेश्वर या मार्गावर आता अत्याधुनिक आणि वातानुकूलित 'ई-शिवाई' बस धावणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा एक नवा पर्याय मिळाला आहे.
पुणे: थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्वारगेट आगारातून विशेष पुढाकार घेतला आहे. स्वारगेट ते महाबळेश्वर या मार्गावर आता अत्याधुनिक आणि वातानुकूलित 'ई-शिवाई' बस धावणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा एक नवा पर्याय मिळाला आहे. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वेळापत्रक आणि फेऱ्यांची माहिती: प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर दररोज चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरून पहिली बस पहाटे ५:३० वाजता सुटेल, तर दुसरी फेरी सकाळी ६:३० वाजता असेल. दुपारच्या सत्रात ३ आणि ४ वाजता बसेस मार्गस्थ होतील. महाबळेश्वरवरून परतीच्या प्रवासासाठी सकाळी ९:०० आणि १०:०० वाजता, तर सायंकाळी साडेसहा आणि साडेसात वाजता बसेस उपलब्ध असतील. या वेळापत्रकामुळे पर्यटकांना दिवसा जाऊन संध्याकाळी परतणे किंवा मुक्कामाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
advertisement
या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे अधिकृत मोबाईल अॅप किंवा महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://npublic.msrtcors.com/) घरबसल्या तिकिटे आरक्षित करता येतील. ज्या प्रवाशांना ऑनलाइन आरक्षण करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी स्वारगेट बसस्थानकावरील आरक्षण खिडकीवर थेट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी नागरिकांना या प्रदूषणमुक्त आणि हायटेक बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ई-शिवाईमधील आसनव्यवस्था आणि वातानुकूलित यंत्रणेमुळे घाटमाथ्याचा प्रवास अधिक आनंददायी होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 8:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो विकेंडला बिनधास्त करा फिरायचा प्लॅन; स्वारगेट- महाबळेश्वर मार्गावर नवी ‘ई शिवाई’ बससेवा सुरू










