Ajit Pawar Plane Video: धुराचे लोळ अन् डाव्या बाजूला झुकलं, अजितदादांच्या विमान अपघाताचा दुसरा CCTV VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
सकाळपासून विमान अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. अजितदादांच्या यांचं पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर अशातच अजितदादांच्या विमानाच्या अपघातात आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ विमानाला हवेत असतानाच आग लागली असल्याचं दिसत आहे. त्यानंतर विमान कोसळलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास अजितदादांचं विमान क्रॅश झालं. या अपघातात अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळपासून विमान अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की, हवेत असताना विमानातून धुराचे लोळ दिसून येत आहे. पुढे गेल्यानंतर विमान डाव्या बाजूला झुकलं आणि कोसळलं. अवघ्या काही मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. पण, यामध्ये विमान हवेतच असताना आग लागली होती, हे आता समोर आलं आहे.
advertisement
AAIB टीमला ब्लॅक बॉक्स सापडला
दरम्यान, बारामती विमानतळाजवळ सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातात अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला. सकाळी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन रुणालयात पाठवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास AAIB – एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे सोपवण्यात आला होता. संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास AAIB चे महासंचालक स्वतः घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी घटनास्थळीची पाहणी केली आणि विमानातला महत्त्वाचा असलेला ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे. ब्लॅक बॉक्समुळे अपघाताच्यावेळी विमानात काय घडलं होतं, याची समोर येणार आहे.
advertisement
ब्लॅक बॉक्स काय काम करतो?
ब्लॅक बॉक्समध्ये प्रत्यक्षात दोन उपकरणे असतात. CVR (Cockpit Voice Recorder) पायलटचा आवाज, संभाषण, कॉकपिटचा आवाज रेकॉर्ड करतो. FDR (Flight Data Recorder) विमानाचा वेग, उंची, इंजिनची माहिती, तांत्रिक डेटा जतन करतो. या दोन्हींना एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स म्हणतात. ते विमानाच्या मागील भागात स्थापित केले जाते कारण अपघातात कमीत कमी नुकसान होते.
advertisement
हा ब्लॅक बॉक्स एका अतिशय खास तंत्राचा वापर करून बनवला आहे जेणेकरून तो अपघात, आग, पाणी आणि धक्क्यांना तोंड देऊ शकेल. मजबूत मटेरियलपासून बनवलेला ब्लॅक बॉक्सचा बाह्य भाग टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे, जो एक अतिशय शक्तिशाली धातू आहे.
तीव्र आगीतही टिकून राहतो. 1100°C पर्यंतच्या आगीत सुमारे 60 मिनिटे टिकून राहण्यासाठी हे डिझाइन केलेले आहे. म्हणजे, विमान जळले तरी त्याचा डेटा सुरक्षित राहतो. जास्त दाब आणि पाण्यातही सुरक्षित: जर विमान समुद्रात पडले तर हा ब्लॅक बॉक्स 20,000 फूट खोलीपर्यंत पाणी आणि दाब सहन करू शकतो.
advertisement
आतील थर सुरक्षा प्रदान करतो. ब्लॅक बॉक्सच्या आत अनेक थर आहेत, ज्यामध्ये इन्सुलेशन, थर्मल प्रोटेक्शन आणि शॉक अॅब्सॉर्बर यांचा समावेश आहे, जे कोणत्याही टक्कर किंवा तापमानापासून आत डेटाचे संरक्षण करतात. ब्लॅक बॉक्समध्ये पाण्याखालील लोकेटर बीकन देखील आहे, जो पाण्यात पडल्यावर सिग्नल पाठवतो. हा सिग्नल सुमारे 30 दिवस टिकतो, जो शोध पथकाला तो शोधण्यास मदत करतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 7:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Plane Video: धुराचे लोळ अन् डाव्या बाजूला झुकलं, अजितदादांच्या विमान अपघाताचा दुसरा CCTV VIDEO







