पुजाराने 99 धावांची वादळी खेळी, पण शेवटच्या तीन बॉलमध्ये 3 धावा काढता आल्या नाही, मॅचमध्ये काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
चेतेश्वर पुजारा 99 वर धावांवर खेळत होता,त्यावेळेस त्याला शतकासाठी एक धाव आणि संघाच्या विजयासाठी तीन धावांची गरज होती. मात्र त्याला ना शतक ठोकता आलं, ना त्याला संघाला सामना जिंकवता आला आहे. त्यामुळे सामन्यात नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
Cheteshwar Pujara News : आगामी टी20 वर्ल्डकप कधी एकदा सूरू होतेय, याची उत्सुकता चाहत्यांना असताना आता तिकडे वर्ल्ड लिजेंड प्रो टी20 लीगमध्ये चेतेश्वर पुजाराने वादळी खेळी केली आहे. चेतेश्वर पुजारा 99 वर धावांवर खेळत होता,त्यावेळेस त्याला शतकासाठी एक धाव आणि संघाच्या विजयासाठी तीन धावांची गरज होती. मात्र त्याला ना शतक ठोकता आलं, ना त्याला संघाला सामना जिंकवता आला आहे. त्यामुळे सामन्यात नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर चेतेश्वर पुजारा हा गुरुग्राम थंडर्सकडून खेळत होता. या सामन्यात दुबई रॉयल्सने गुरुग्राम थंडर्ससमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुरुग्राम थंडर्सची सूरुवात खूपच खराब झाली होती. कारण फिल मस्टर्ड अवघ्या 7 धावांवर बाद झाला होता.त्याच्यासोबत जरमेन ब्लॅकवुड देखील 8 धावांवर बाद झाला होता.
Pujara unleashed a rare masterclass in 5th gear but fell just an inch short of glory 📏💔
.
.
[World Legends T20 Pro League, Cheteshwar Pujara, Cricket, Near Miss, Knock, Close, Gurugram Thunders, Highlights] pic.twitter.com/dg11t2DGad
— FanCode (@FanCode) January 28, 2026
advertisement
गुरग्रामचे झटपट दोन विकेट पडल्यानंतर चेतेश्वर पुजाराने संघाचा डाव सावरला होता. त्याच्यासोबत कोलीन डे ग्रॅडहोमने 22 धावांची खेळी केली. त्यानंतर पुजारा आणि कर्णधार थिसारा परेराने वादळी खेळी करायला सूरूवात केली होती. या दरम्यान चेतेश्वर पुजारा तडाखेबाज फलंदाजी करत असताना तो 99 धावांपर्यंत पोहोचला होता.त्याला शतकासाठी एक धाव आणि ग्ररुग्राम संघाला सामना जिंकून देण्यासाठी तीन बॉलमध्ये तीन धावांची आवश्यकता होती. त्यामुळे पुजारा आपलं शतक पूर्ण करून आरामात सामना जिंकवेल असे वाटत होते. पण पियुश चावलाने अख्खी मॅच फिरवली.
advertisement
दुबई रॉयल्सकडून खेळणाऱ्या पियुश चावलाने चेतेश्वर पुजाराला स्टम्प आऊट केले होते.या स्टम्पिंग आऊटमुळे अख्खी मॅच फिरली होती. कारण या स्पम्पिंग नंतर चेतेश्वर पुजाराचे शकत हुकलं.त्यानंतर गुरुग्राम थंडर्सला तीन बॉलमधअे तीन धावांची आवश्यकता होती.त्यावेळेस चिराग गांधी मैदानात उतरला होता.त्याने चावलाचे दोन बॉल डॉट केले त्यानंतर शेवटच्या बॉलवर गांधी क्लिन बोल्ड झाला होता.जर 56 वर नाबाद असलेल्या थिसारा परेराला संधी मिळाली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता.
advertisement
दरम्यान दुबई रॉयल्सकडून समित पटलने 65 धावांची नाबाद खेळी केली.त्याच्यासोबत अंबाती रायडूने 45 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दुबई रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 8:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पुजाराने 99 धावांची वादळी खेळी, पण शेवटच्या तीन बॉलमध्ये 3 धावा काढता आल्या नाही, मॅचमध्ये काय घडलं?








