Nakul Bhoir Case: नकुल भोईरला संपवल्यानंतर चैतालीने थंड डोक्याने केला होता प्लॅन B, पण...

Last Updated:

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पत्नी चैताली हिला ताब्यात घेतलं. मात्र घटनास्थळी ३ जणांनी मद्य प्राशन केलं असल्याची शक्यता पोलिसांच्या लक्षात आली.

News18
News18
पुणे : पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. सुरुवातीला
मयत नकुल भोईर यांच्या पत्नी चैतालीनेच नकुल यांचा गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नकुल यांचा खून करताना तिच्यासोबत तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार हा देखील सोबत होता आणि दोघांनी मिळून कट रचून नकुल यांचा निर्घृणपणे खून केल्याचं तपासात समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पत्नी चैतालीचे आरोपी सिद्धार्थसोबतअनैतिक संबंध होते. ही बाब नकुल यांना कळाली तेव्हा त्याने चैतालीला आधी समजून सांगितलं मात्र, त्या नंतरही चैताली आरोपी सिद्धार्थला भेटायची आणि त्यावरून दोघांमध्ये टोकाचे वाद व्हायचे.  दरम्यान घटनेच्या दिवशी देखील हेच घडलं. मात्र, यावेळी केवळ चैताली एकटीच नव्हती नाही तर तिचा मित्र सिद्धार्थ पवार देखील तिच्या सोबत होता.
advertisement
कापडाने आवळला नकुल यांचा गळा
दुपारपासून चैताली आणि नकुल भोईर यांच्यात चारित्र्यावर संशय घेण्यावरून वाद आणि मारहाणीचे प्रकार घडत होते. या वादाने रात्री उशिरा रागाची परिसीमा गाठली आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नकुल याची पत्नी आरोपी चैतालीने नकुलचा कापडाने गळा आवळायला सुरवात केली. त्यावेळी नकुल जीवाच्या आकांताने प्रतिकार करू लागला, ते बघून तिथेच उपस्थिती असलेल्या सिद्धार्थने चैताली ज्या कापडाने नकुलचा गळा आवळत होती, त्याचं दुसरं टोक ओढलं आणि जोराचा हिसका देऊन दोघांनीही नकुलचा खून केला.
advertisement
चैतालीने घेतले स्वत: वर आरोप
त्यानंतर नकुल गतप्राण झाल्याचं चैतालीच्या लक्षात आलं तेव्हा तिने आपला मित्र सिद्धार्थला तिथून जाण्यास सांगितलं आणि पती नकुलच्या खुनाचा सर्व आरोप स्वतःवर घेत स्वतःच पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पत्नी चैताली हिला ताब्यात घेतलं. मात्र घटनास्थळी ३ जणांनी मद्य प्राशन केलं असल्याची शक्यता पोलिसांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी आरोपी चैतालीला विचारलं सुरुवाताला तिने काही सांगितलं नाही, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच  तिने सिद्धार्थचे नावं घेतलं. पोलिसांनी सिद्धार्थला तत्काळ ताब्यात घेतलं आणि त्याच्या उपस्थित राहण्या संदर्भात त्याचा जबाब नोंदविला आणि इथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
advertisement
सिद्धार्थ पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला
आरोपी सिद्धार्थ याने आपल्या जबाबात दिलेली माहितीनुसार, पोलिसांनी घटना स्थळावरील CCTV फुटेज तपासले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सिद्धार्थने जबाबत दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात cctv मध्ये दिसणारी दृश्य यामध्ये बरीच तफावत आहे. खास करून आरोपी सिद्धार्थ हा घटनास्थळावर येणे आणि परत जाणे या दरम्यान असलेली वेळ जुळत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी सिद्धार्थ पवारला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.  दरम्यान, आता नकुल भोईर यांच्या खुन केल्या प्रकरणी सिद्धार्थ पवारला अटक करून न्यायालय समोर हजर केले असता पुढील तपासकामी दोन्ही आरोपींना 1 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Nakul Bhoir Case: नकुल भोईरला संपवल्यानंतर चैतालीने थंड डोक्याने केला होता प्लॅन B, पण...
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement