Central Railway: पुणे- नागपूर, पुणे- गोरखपूर मार्गावर विशेष गाड्या; मध्य रेल्वेकडून सणानिमित्त प्रवाशांना दिलासा
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, मध्य रेल्वेचा पुणे विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.उद्या म्हणजेच 27 ऑक्टोबरला आठ विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात येणार आहेत.
पुणे: सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, मध्य रेल्वेचा पुणे विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.उद्या म्हणजेच 27 ऑक्टोबरला आठ विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात येणार आहेत. या गाड्या गोरखपूर, दानापूर, नागपूर, रेवा, लातूर, सांगानेर, हिसार आणि हजरत निजामुद्दीनसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतील. या आठ विशेष गाड्या पुणे, हडपसर, खडकी, दौंड आणि कोल्हापूर स्थानकांवरून सुटतील. यामुळे उत्तर आणि मध्य भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट अगोदरच बुक करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पुणे विभागातून सुटणाऱ्या गाड्या
1.पुणे–गोरखपूर विशेष (01415) पुणेहून 06:50 वाजता सुटते. दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाल, कानपूर सेंट्रल आणि लखनौ मार्गे गोरखपूर पोहचते.
2.पुणे–दानापूर विशेष (01449) पुणेहून 15:30 वाजता सुटते. दौंड, इटारसी, जबलपूर, प्रयागराज छेओकी, बक्सर मार्गे दानापूर पोहचते.
3.पुणे–हजरत निजामुद्दीन विशेष (01493) पुण्याहून 17:30 वाजता सुटते. लोणावळा, कल्याण, वसई, सुरत, वडोदरा, रतलाम, मथुरा मार्गे हजरत निजामुद्दीन पोहचते.
advertisement
4.पुणे–नागपूर विशेष (01409) पुण्याहून 20:30 वाजता सुटते. दौंड, बेलापूर, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा मार्गे नागपूर पोहचते.
5.हडपसर–रेवा विशेष (01752) हडपसरहून 06:40 वाजता सुटते. दौंड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर मार्गे रेवा पोहचते.
6.हडपसर–लातूर विशेष (01430) हडपसरहून 16:05 वाजता सुटते. दौंड, जेऊर, बार्सी टाउन, मुरुड मार्गे लातूर पोहचते.
7.खडकी–सांगनेर विशेष (01407) खडकीहून 09:45 वाजता सुटते. लोणावळा, कल्याण, भिवंडी, वसई, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, भवानी मंडई मार्गे सांगनेर पोहचते.
advertisement
8.खडकी–हिसार विशेष (04726) खडकीहून 17:00 वाजता सुटते. चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, जयपूर, सिकर मार्गे हिसार पोहचते.
9.दौंड–कलबुर्गी अनारक्षित विशेष (01421) दौंडहून 05:00 वाजता सुटते. भिगवण, पारेवाडी, जेऊर, माढा, सोलापूर, होटगी मार्गे कलबुर्गी पोहचते.
10.कोल्हापूर–कलबुर्गी विशेष (01451) कोल्हापूरहून 06:10 वाजता सुटते. हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, पंढरपूर, सोलापूर, गंगापूर रोड मार्गे कलबुर्गी पोहचते.
advertisement
वरील सर्व विशेष गाड्यांचे तिकीट संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.inवर उपलब्ध आहेत. प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲपवरून थांबे व वेळा तपासू शकतात.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 26, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Central Railway: पुणे- नागपूर, पुणे- गोरखपूर मार्गावर विशेष गाड्या; मध्य रेल्वेकडून सणानिमित्त प्रवाशांना दिलासा


