तरुणानं मित्राच्या मदतीनं सुरु केली दादाची शाळा; सिग्नल आणि रस्त्यावर राहणारी मुलं घेतायत शिक्षणाचे धडे Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या शाळेमुळे सिग्नल, रस्त्यावर, वस्तीवर राहणारी मुलं शिक्षणाचे धडे गिरवू लागली. गेली चार वर्ष झालं ही शाळा शहरातील उपनगर भागात मुलांना शिकवत आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना नेहमीच जाताना येताना सर्व जण हे पाहत असतात. पण यांच्या शिक्षणाच काय ते शाळेत जातात का? असाच प्रश्न पडला पुण्यात राहणाऱ्या अभिजित पोखरनिकर या तरुणाला आणि या तरुणाने मित्राच्या मदतीने दादाची शाळा सुरु केली. या शाळेमुळे सिग्नल, रस्त्यावर, वस्तीवर राहणारी मुलं शिक्षणाचे धडे गिरवू लागली. गेली चार वर्ष झालं ही शाळा शहरातील उपनगर भागात मुलांना शिकवत आहे.
advertisement
कशी झाली सुरुवात?
दादाची शाळा अभिजित पोखरणीकर याने त्याचा मित्र शुभम माने यांच्या मदतीने सुरु केलीली आहे. या शाळेबद्दल माहिती देताना अभिजित पोखरणीकर याने सांगितले की, दादाची शाळा ही चार वर्षा पूर्वी स्थापन केली. ही शाळा पूर्णपणे शिक्षणावर काम करते. रस्त्यावर, सिग्नलवर किंवा वाड्या पाड्यामध्ये जाताना मलं दिसतात आणि आपण त्यांना सतत पाहत असतो. तर एक विचार यायचा की या मुलांच्या शिक्षणासाठी कोण काय करतं? त्यामुळे शुभम आणि मी बसून विचार केला की आपण यावर काम करू शकतो. त्यामुळे जीवनात त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आम्ही सिग्नल, रस्त्यावर राहणारी, वाड्या वास्त्यावर राहणारी मुलं जी शिक्षणापासून वंचित आहेत ती शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून दादाची शाळा सुरु केली.
advertisement
सातवीत शिकणाऱ्या मुलाची कमाल; एकाच वेळी मिळवल्या एकूण 7 शिष्यवृत्ती
जी मुलं सिग्नल, रस्त्यावर वर राहतात त्यांना रस्त्याच्या कडेला शिकवणे. तसेच वाड्या वस्त्यावर राहणारी मुलं आहेत जी शिक्षणाच्या प्रवाहात नाही येत त्यांना त्या प्रवाहात आणून त्याने शिकवणे, कागदपत्रे तयार करणे, सरकारी योजनाचा लाभ त्यांना मिळून देणे या सर्व गोष्टी दादाच्या शाळेच्या माध्यमातून आम्ही करतो. आजची लहान मुलं उद्याची युवा पिढी आणि युवा पिढी हे भारताच भविष्य आहे. त्यामुळे या मुलांना घडवणं फार महत्त्वाचं आहे. अपर केजी ते पहिल्या वर्गातील मुलं आमच्या शाळेत आहेत. म्हणजे सर्वच वयोगटातील मुलं आहेत. आता 250 स्वयंम सेवक हे संस्थेमध्ये काम करतात, अशी माहिती अभिजित पोखरणीकर याने दिली आहे.
advertisement
नापास झालेल्या विद्यार्थ्याची कहाणी, आता केंद्र सरकार देणार या विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला तब्बल इतके रुपये
कोरोना काळामध्ये खूप वेळ भेटायचा तो वेळ आपण कुठे तरी वापरला पाहिजे असं वाटायचं. त्यामुळे सिग्नलवर, रस्त्यावर राहणाऱ्या, वाड्या वास्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दादाची शाळा सुरु केली. सुरुवातीला फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद नव्हता म्हणजे अनेक जण नाव देखील ठेवत होते. परंतु या गोष्टीकडे लक्ष न देता ते तसेच सुरु ठेवलं आणि आता चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे. शहरातील चार ठिकाणी आकुर्डी, बिजली नगर, पाषाण, कात्रज अश्या भागात ही शाळा भरते. आता जवळ पास 1700 मुलं या दादाच्या शाळेत शिकतात, अशी माहिती शुभम माने याने दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 28, 2024 11:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
तरुणानं मित्राच्या मदतीनं सुरु केली दादाची शाळा; सिग्नल आणि रस्त्यावर राहणारी मुलं घेतायत शिक्षणाचे धडे Video