Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, 'म्हणाल्या माझ्या भावाची..'
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतली, या भेटीवर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे, जितेंद्र जाधव, प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी उत्सुकता वाढत आहे. यावेळी सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे कारण यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात हायहोल्टेज मुकाबला होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे.
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांची गळाभेट
दरम्यान शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त एका मंदिरात या ननंद भावजय समोरासमोर आल्या, आणि त्यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्रच असल्याची चर्चा सुरू झाली. या भेटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वहिनींची सुनेत्रा पवारांची गळाभेट घेतली. या गळाभेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदिरात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली. या भेटीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
'जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस मान सन्मान केलाच पाहिजे, त्या माझ्या भावाची बायको आहेत त्या माझ्या मोठ्या वहिनी आहेत. आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तींचा सन्मान केलाच पाहिजे, असं माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये आहे. त्याच पद्धतीनेच मी सर्वांशी वागणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया
view comments‘महाशिवरात्रीनिमित्त विविध शिवमंदिरात दर्शनासाठी जाताना जळोची येथील काळेश्वर मंदिरात गेले होते. त्या ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. अबाल वृद्ध, स्थानिक नागरिक, वारकरी बांधव यांची भेट झाली. दर्शन घेऊन भोवतालच्या गराड्यातून, जनसमुदयासोबत बाहेर पडताना समोरून सुप्रिया सुळे ताई येत होत्या, त्यांची भेट झाली. त्यांनी मला महाशिवरात्रीच्या तर मी त्यांना महाशिवरात्र व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन करून, गळाभेट घेऊन सुप्रियाताईंना मोठ्या आनंदाने निरोप दिला,' असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
March 09, 2024 3:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर, 'म्हणाल्या माझ्या भावाची..'


