बैलपोळ्याची कुंभारवाड्यात लगबग! बिया अन् मातीपासून अशाप्रकारे होतेय बैलांची निर्मिती
- Reported by:Shivani Dhumal
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा करतात. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील भाबवडी, धनावडेवाडी, कान्हवडी, आंबाडे, खानापूर यांसारख्या परिसरात आखाडी बैलपोळा साजरा केला जातो.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : भारत हा देश कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला अनन्य साधारण महत्व आहे. यंदा अवकाळी पावसामुळे शेतीची पुर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. जून महिन्यांत पेरणी पूर्ण होऊन भात लावणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. आखाडी बैलपोळा काही दिवसांवर येवून ठेपला आहे. कुंभारकाम काम करणारे मातीपासून बैल बनविण्याच्या कामात गुंतले आहेत. शेतातील माती आणि बियांपासून बैलं बनवण्याची कामे सुरू झाली आहे. यादरम्यान, ग्रामीण भागातून या बैलांना मोठी मागणी आहे.
advertisement
वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा करतात. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील भाबवडी, धनावडेवाडी, कान्हवडी, आंबाडे, खानापूर यांसारख्या परिसरात आखाडी बैलपोळा साजरा केला जातो. हजारोंच्या संख्येने बैल बनविण्याचे काम कुंभार समाजातील बांधव करीत असतात.
वय 75, पण आज्जी करते चायनीज भेळचा व्यवसाय; नवी मुंबईतील याठिकाणी खवय्यांना मिळतेय उत्कृष्ट चव
उत्रौली व पंचक्रोशीत तयार होणाऱ्या मातीच्या बैलांना पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच काही शाडुच्या बैलाच्या मागणीनुसार बैल बनविले जातात. या व्यवसायात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात येत असल्याने या व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे. पारपांरिक मातीच्या बैलांबरोबर शाडुचे, प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर होतो आहे. या बैलांना आकर्षक रंगसंगती वापर करून रंगवले जाते. यांची किंमत साधारण 150 ते 300 इतकी असते.
advertisement
मातीचे बैल कसे बनवतात?
बैल हे वारुळाची माती, काळी माती, तांबडी माती, घोड्याची लिद, राख, विविध वनस्पतींच्या बिया यांचे मिश्रण करून बनवले जाते. मातीचे बैल तयार करणे सिद्ध हस्त कला आहे. इतर चित्राप्रमाणे मातीपासून बैल बनविण्याकरीता छाप नसतात. त्यामुळे बैलजोडीत समानता आणण्याकरीता कुशलतापूर्वक काम करावे लागते. तसेच शेतकरी बैलपोळा सण साजरा केल्यावर बैलाचे विसर्जन शेतात, बांधावर करतात. त्यामुळे बैल बनविताना वेगवेगळ्या वनस्पतीच्या बिया आम्ही कारागीर मातीत टाकतो, जेणेकरून शेताच्या बांधावर या बियातुन वृक्षारोपण व्हावे, अशी माहिती नामदेव कुंभार यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jul 12, 2024 1:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
बैलपोळ्याची कुंभारवाड्यात लगबग! बिया अन् मातीपासून अशाप्रकारे होतेय बैलांची निर्मिती







