दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात खास कार्यक्रमाचे आयोजन, गजानन जन्मोत्सवानिमित्त स्वराभिषेकची मैफल रंगणार
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
विनायकी चतुर्थीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शनिवारी, 25 ऑक्टोबर 2025 अर्थात उद्या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
पुणे: कार्तिक शुद्ध चतुर्थी हा दिवस श्री गणेश भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान श्री गणेशाचा उमांगमलज हा अवतार झाला, अशी श्रद्धा आहे. संपूर्ण देशभर, विशेषतः महाराष्ट्रात, या दिवशी श्री उमांगमलज जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. मंदिरे, गणेश संस्थानं आणि घराघरांत पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन यांचे आयोजन करून भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात.
कार्तिक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचा उमांगमलज हा दिव्य अवतार झाला, असा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये आढळतो. हा दिवस गणेश भक्तांसाठी अत्यंत पवित्र असून, श्री गजानन जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्री गणेशाची मूळ कथा म्हणजेच देवी पार्वतीने अंगावरील मळापासून तयार केलेल्या बालकाची आहे. हा बालक पुढे भगवान शंकरांच्या रुद्र रूपाशी युद्ध करतो आणि नंतर भगवान विष्णूंनी आणलेल्या गजमस्तकाने त्याला नवजीवन प्राप्त होते. हेच ते बालरूप श्री गणेश ज्यांना ‘उमांगमलज’ असे म्हणतात.
advertisement
उमा म्हणजे पार्वती आणि अंगमलज म्हणजे अंगावरील मळापासून उत्पन्न झालेला असा याचा शब्दशः अर्थ होतो. मात्र, अध्यात्माच्या दृष्टीने ही कथा केवळ प्रतीकात्मक आहे. पार्वती म्हणजे आपल्या अंतःकरणातील बुद्धी आणि तिच्यावर चढलेला अहंकार व ममत्व हा मळ आहे. जेव्हा हा मळ म्हणजेच अहंकाराचा थर दूर होतो, तेव्हा बुद्धी शुद्ध होते आणि आत्मबोधाची अनुभूती मिळते. या आत्मबोधाचं प्रतीक म्हणजेच उमांगमलज.
advertisement
या दिवशी अनेक ठिकाणी विशेष उत्सव साजरे होतात. श्री सिद्धिविनायक, चिंतामणी, मोरया गोसावी, दगडूशेठ गणपती आणि इतर प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विघ्न दूर होतात, बुद्धी शुद्ध होते आणि जीवनात स्थैर्य येते. अनेक ठिकाणी समाजसेवा उपक्रम, अन्नदान आणि रक्तदान शिबिरे यांचे आयोजन करून भक्त गणेशभक्तीला सामाजिक रूपही देतात.
advertisement
विनायकी चतुर्थीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शनिवारी, 25 ऑक्टोबर 2025 अर्थात उद्या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पहाटे 3 वा, स्वराभिषेक पहाटे 4 ते 6 गायिका शेफाली कुलकर्णी- साकुरीकरसोबत आणि गणेशयाग सकाळी 8 ते दु. 12 वाजेपर्यंत अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 24, 2025 6:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात खास कार्यक्रमाचे आयोजन, गजानन जन्मोत्सवानिमित्त स्वराभिषेकची मैफल रंगणार


