Vanraj Andekar : शत्रूला हाताशी धरून केली गेम, टोळीतल्या साथीदाराच्या खुनाचा घेतला बदला
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
आंदेकर यांच्याशी जुना वाद असलेल्यांना हाताशी धरून कोमकर यांनी ही हत्या केली. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी सोमनाथ गायकवाडची मदत घेतली.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे : पुण्यात नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड त्यांच्या सख्ख्या बहिणीचा पतीच असल्याचं समोर आलंय. आंदेकर यांच्याशी जुना वाद असलेल्यांना हाताशी धरून कोमकर यांनी ही हत्या केली. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी सोमनाथ गायकवाडची मदत घेतली. सोमनाथच्या टोळीतील एकाची हत्या वर्षभरापुर्वी झाली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड टोळीने कोमकरांना सोबत घेऊन हा प्लॅन आखला.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनराज आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्याच पूर्व वैमनस्य होतं. वनराज आंदेकरचे कौटुंबिक वाद असल्याचं सोमनाथ गायकवाडला समजलं. वर्षभरापूर्वी सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील आखाडेची हत्या झाली होती. आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाडच्या टोळीने कोमकरांना सोबत घेऊन ही हत्या घडवून आणली. वनराज गायकवाडच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. अनिकेत दहीभाते असं हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव आहे.
advertisement
सख्ख्या बहिणीनेच वनराज आंदेकर यांना पोलीस ठाण्यात थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. वनराज आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामधे आला आहेस. तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन ठोकतेच.’ असं धमकावलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची खरोखरच हत्या झाली.
advertisement
वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केलीय. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता.आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2024 2:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Vanraj Andekar : शत्रूला हाताशी धरून केली गेम, टोळीतल्या साथीदाराच्या खुनाचा घेतला बदला