Vanraj Andekar : कोण आहे वनराज आंदेकर? बापच टोळीचा म्होरक्या, तर आई माजी नगरसेवक

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. वनराज आंदेकर हे 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगसेवक म्हणून निवडून आले होते.

News18
News18
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ इथं गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत आंदेकर यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र केईएम रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. वनराज आंदेकर हे 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगसेवक म्हणून निवडून आले होते.
2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते. त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या. 2007 आणि 2012 अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भुषवलं होतं. तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते. वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.
गेल्या २५ वर्षांपासून आंदेकर टोळीची दहशत
गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता. प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज आंदेकरचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झालीय. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सूर्यकांत आंदेकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या असून 1985 पासून अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
advertisement
आंदेकर-माळवदकर टोळीयुद्ध आणि खून
आंदेकर माळवदकर टोळीयुद्धात खून प्रकरणी सूर्यकांत आंदेकर जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आला. बाहेर आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच होती. दहशतीमुळे स्थानिकही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. आंदेकर टोळीकडून अलिकडेच अतुल कुडले याच्या खुनाचाही प्रयत्न झाला. वर्चस्व कमी होत असल्याच्या रागातून हा प्रयत्न केला असल्याची माहिती समजते.
advertisement
काही दिवसांपूर्वीच वडील जामीनावर बाहेर
वनराजचे वडील बंडू आंदेकर याच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे. नुकतेच बंडू आंदेकरसह इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याआंतर्गत (मकोका) आरोप ठेवण्यात आले होतं, पण याप्रकरणी जामीन मिळाला होता. वनराज आंदेकरवर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयितांची नावं आहे. पोलीस सध्या मारेकऱ्यांच्या शोधात आहेत.
advertisement
का केली हत्या?
उदयकांत आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं, त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Vanraj Andekar : कोण आहे वनराज आंदेकर? बापच टोळीचा म्होरक्या, तर आई माजी नगरसेवक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement