Barshi Crime : 'उस नजर बीच बसा कर', इकडं माजी उपसरपंचानं स्वत:ला संपवलं, तिकडं पूजा गायकवाडचं शेवटचं Reel व्हायरल!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Barshi Former Deputy Sarpanch ends Life : कृष्णा चित्रपटातील झांझरिया या रिमिक्स गाण्यावरती नाचतानाचं तिचं शेवटचं रील एक दिवसापूर्वी शेअर केलेलं आहे.
Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये बीडच्या एका माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी सोमवारी मध्यरात्री गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Barshi Former Deputy Sarpanch ends Life) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्यासोबत गोविंद यांचे प्रेमसंबंध होते. अबोला आणि सततचे वाद सहन न झाल्याने गोविंदने टोकाचे पाऊल उचलले, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
पूजा गायकवाडचं शेवटचं Reel
पूजा गायकवाडचं शेवटचं रील हे एका हिंदी चित्रपटातील गाण्यावरती आहे, कृष्णा चित्रपटातील झांझरिया या रिमिक्स गाण्यावरती नाचतानाचं तिचं शेवटचं रील एक दिवसापूर्वी शेअर केलेलं आहे. यापूर्वी देखील तिने तिचे नाचतानाच आणि इतर व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावरती शेअर केलं आहे.
आत्महत्येच्या दिवशीच तीन रील पोस्ट
advertisement
विशेष म्हणजे आत्महत्येच्या दिवशीच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तीन रील पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर मात्र तिने कोणतीही पोस्ट न केल्याचे आढळले आहे. या घटनेमुळे बर्गे कुटुंबीय आणि गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपांच्या अनुषंगाने पूजाकडून विस्तृत चौकशी केली जात आहे.
advertisement
दरम्यान, पुजाने वेळोवेळो पैसे, सोने नाणे, मावशीचे आणि नातेवाईकाचे नावावर प्लॉट, जमीन यापूर्वी नावावर घेवून दिली होती, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच पुजा बंगला नावावर करण्यासाठी हट्ट करत होती. याचमुळे गोविंदने आयुष्य संपवलं होतं. गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पूजा गायकवाड हिच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 10, 2025 2:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Barshi Crime : 'उस नजर बीच बसा कर', इकडं माजी उपसरपंचानं स्वत:ला संपवलं, तिकडं पूजा गायकवाडचं शेवटचं Reel व्हायरल!