Pune Water News: पुणेकरांनो लक्ष द्या...! अर्ध्याहून अधिक शहरात गुरुवारी पाणी बंद; यादीत तुमचाही परिसर आहे का?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, येत्या गुरूवारी पुणे महानगर पालिकेतील काही महत्त्वाच्या भागांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे.
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, येत्या गुरूवारी पुणे महानगर पालिकेतील काही महत्त्वाच्या भागांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे. याबद्दलचे वृत्त अलीकडेच पुणे महानगर पालिकेच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. अनेक प्रमुख भागांमध्ये येत्या गुरूवारी पाणी कपात केली जाणार आहे, कोण कोणत्या परिसरामध्ये पाणी कपात केली जाणार आहे, जाणून घेऊया...
येत्या गुरूवारी दिनांक 20-11-2025 रोजी नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (500 एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर आणि पर्वती LLR टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र आणि त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल.आर, एस.एन.डी.टी. एम.एल.आर टाकी परिसर, चतुश्रुंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. 1 आणि 2, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र आणि नव्याने समाविष्ट गावे बुस्टर पंपिंग अंतर्गत येणारा परिसर येथील विद्युत पंपींग विषयक आणि वितरण व्यवस्था स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी व खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत 3000 मी.मी व्यासाची रॉ वॉटर पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे.
advertisement
खडकवासला धरणातून दोन 1400 मी.मी. व्यासाच्या पाईप लाईन 3000 मी. मी व्यासाच्या पाईप लाईनला जोडण्यात आले आहेत. खडकवासला ते पर्वती 3000 मी.मी व्यासाच्या लाईनवरील फ्लो मीटर बसविणे व 1400 मी. मी लाईनवरील बटरफ्लाय वॉल्व्ह बसविणे या करिता 1400 मीमी व्यासाचे स्लुईस वॉल्व्ह पूर्ण बंद होत आहेत याच्या तपासणीसाठी व वडगाव जलशुद्धीकरण फेज 2 ची क्षमता वाढविण्यासाठी नवीन संपवेल टाकीच्या भिंतीला कोअर कटिंग करण्यासाठी तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी तसेच इतर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवार दि.20-11-2025 रोजी धरणातून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा सकाळी 06:00 ते रात्री 12:00 पर्यंत बंद करावा लागणार आहे. शुक्रवार दि.21-11-2025 रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 17, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water News: पुणेकरांनो लक्ष द्या...! अर्ध्याहून अधिक शहरात गुरुवारी पाणी बंद; यादीत तुमचाही परिसर आहे का?


