दिवाळीत थंडीची दांडी, नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर हिट! मग हुडहुडी कधी भरणार?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Weather Forecast: दरवर्षी दिवाळीत थंडीचा जोर असतो. परंतु, यंदा हवामानाचे चित्र वेगळे आहे. नोव्हेंबरमध्येही उन्हाचे चटके जाणवत आहेत. याचं कारण जाणून घेऊ.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : दरवर्षी साधारण दिवाळी दरम्यानं थंडी जाणवत असते. परंतु यंदा मात्र अजूनही थंडी जाणवत नाही. ऋतुचक्राचा कल थोडासा पुढे सरकल्याने नोव्हेंबरमध्ये नागरिकांना थंडीऐवजी उष्म्याचा सामना करावा लागणार आहे. या कालावधीत किमान तापमान सरासरीच्या वर राहणार असून, काही प्रदेश वगळता उष्म्याची ही स्थिती सर्वसाधारण कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मग यंदा नोव्हेंबरमधील हवामानाची स्थिती काय राहील? याबाबत हवामान शास्त्रज्ञ जालिंदर कांबळे यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
नोव्हेंबरमध्ये थंडीचा जोर नाहीच
यंदा नोव्हेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या उत्तर पुणे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यात तापमान घसरण्यास सुरुवात होईल. हे तापमान 21 नोव्हेंबर पर्यंत 14 ते 16 अंश सेल्शिअस राहण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमान हे 12 ते 16 अंश सेल्शिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळणार नाही. तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमाना 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते.
advertisement
म्हणून कडाक्याची थंडी नाही
यंदा परतीचा पाऊस लांबा होता. अजूनही काही राज्यांत पावसाच्या सरी बरसत आहेत. हवेची आद्रता जास्त आहे. ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिल्यामुळे वाऱ्यांचा पूर्वेकडील प्रभाव राज्यावर जास्त आहे. त्यामुळे थंडीचा कालावधी पुढे गेला आहे. थंडी पडण्यासाठी पश्चिमी वारे यावे लागतात. हे वारे जोपर्यंत राज्यावर येत नाहीत, तोपर्यंत कडाक्याची थंडी जाणवत नाही, असेही कांबळे यांनी सांगितले.
advertisement
डिसेंबरमध्ये पारा घसरणार
view commentsपुणेकरांना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीची चाहूल जाणवण्यास सुरुवात होईल. या काळात 14 ते 18 अंश सेल्शिअस पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. पण तापमान अगदी 10 अंश सेल्शिअस पर्यंत येण्यासाठी डिसेंबर उजडण्याची शक्यता आहे, असंगी पुणए कृषी विभागातील हवामान शास्त्रज्ञ जालिंदर कांबळे यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 09, 2024 4:21 PM IST

