आताच का भाडेवाढ? एसटीच्या तिकिट दरवाढीवर पुणेकर संतापले, सरकारला थेट सवाल Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
एसटीचा प्रवास महागला असून 15 टक्के दरवाढ झाल्याने 100 रुपयांच्या तिकीटासाठी आता 115 रुपये मोजावे लागणार आहेत. एसटीच्या तिकिट दरवाढीबद्दल पुण्यातील प्रवाशांना काय वाटतं? याबद्दच लोकल 18 च्या प्रतिनिधीने जाणून घेतलं.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : सर्वसामान्यांची लाल परीचा प्रवास हा महागणार आहे. आता एसटी बस आणि खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सरकारने बस, ऑटो आणि टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीत 15 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. एसटीचा प्रवास महागला असून 15 टक्के दरवाढ झाल्याने 100 रुपयांच्या तिकीटासाठी आता 115 रुपये मोजावे लागणार आहेत. एसटीच्या तिकिट दरवाढीबद्दल पुण्यातील प्रवाशांना काय वाटतं? याबद्दच लोकल 18 च्या प्रतिनिधीने जाणून घेतलं.
advertisement
परिस्थितीच्या मानाने दर वाढ करण्याचा निर्णय योग्य नाही. महिलांना आधीच हाफ तिकीट पुरुषांना पूर्ण आणि त्यामध्ये ही दर वाढ सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं? गरीब कष्ट करून खाणारे आम्ही आहोत, असं एका प्रवाशाने सांगितले.
सर्वच गोष्टीमध्ये ही महागाई होत चालली आहे. त्यात जर तिकीट वाढ होणार असेल तर प्रवास कसा करायचा? अशी प्रतिकिया एका प्रवाशाने दिली.
advertisement
दरम्यान, एसटीने विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात सरसकट 18 टक्के भाडेवाढ होती. मात्र, आता त्यात सुधारणा करण्यात आल्या असून 15 टक्के दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामुळे पुणेकर जे आहेत ते संतापलेले पाहिला मिळत आहेत. सर्व सामान्य नागरिकांनी कसा प्रवास करायचा? असा प्रश्न जो आहेत तो विचारला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 24, 2025 7:12 PM IST









